पिंपरी : एका बँकेच्या गैरव्यवहारप्रकरणी बँकेच्या माजी अध्यक्षाच्या घरावर सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) पथकाने जानेवारी महिन्यात छापा टाकला होता. त्यानंतर पुन्हा त्याच प्रकरणात मंगळवारी (दि. ४) दोन ठिकाणी छापे टाकले आहेत. जानेवारीमध्ये झालेल्या कारवाईत ईडीने बँकेच्या गैरव्यवहार प्रकरणी शेकडो कागदपत्रे तसेच इतर मालमत्तांची चौकशी केली होती. गैरव्यवहार झाल्याचा संशय आल्याने ईडीने दोन महिन्यांच्या अवकाशानंतर पुन्हा पिंपरी येथे मंगळवारी दोन ठिकाणी छापे टाले.
मंगळवारी सकाळपासून सुरू झालेली ही कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. या कारवाईत बँकेशी संबंधित काही व्यक्ती व त्यांच्या नातेवाईकांची तसेच इतरांची चौकशी करण्यात आली. मात्र, ईडीने कोणती आणि किती संपत्ती जप्त केली, किती आणि कोणती कागदपत्रे ताब्यात घेतली, याबाबत अधिकृत माहिती मिळू शकली नाही.