शहरं
Join us  
Trending Stories
1
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
2
राजेश लाटकर घेणार उद्धव ठाकरेंची भेट! कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग
3
AUS vs IND : भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा! टीम इंडियासमोर मोठे आव्हान, शिखर धवननं दिला धीर
4
दहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेत समीर भुजबळ यांना दिला पाठिंबा
5
महाले यांची माघार; भुजबळ, आहेर, गावित ठाम! दिंडोरीत नरहरी झिरवाळ यांना दिलासा
6
"मी यापुढे मराठी बोलणार नाही..."; रेल्वे टीसीची मुजोरपणा, मराठी माणसाला धमकावलं
7
चातुर्मासाची सांगता: कार्तिकी एकादशी कधी आहे? विष्णुप्रबोधोत्सव महात्म्य अन् मान्यता
8
बारामतीचं राजकीय तापमान वाढणार: अजित पवारांना शह देण्यासाठी शरद पवार मैदानात; आज ६ ठिकाणी सभा!
9
Niva Bupa IPO : 'या' दिग्गज हेल्थ इन्शूरन्स कंपनीचा IPO येणार; किंमत किती, कधीपासून करता येणार अर्ज?
10
...यासाठी बाळासाहेब ठाकरे राज ठाकरेंना माफ करणार नाहीत; संजय राऊत भडकले
11
आजपासून महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ; पहिली सभा कोल्हापुरात, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार!
12
Devayani Farande : मध्य नाशिक मतदारसंघात बंडखोरांच्या माघारीचा भाजपाच्या देवयानी फरांदेंना फायदा
13
मराठी अभिनेत्रींना हिंदी सिनेमांत कामवाली बाईच का दाखवतात? तृप्ती खामकर म्हणाली- "कारण..."
14
Maharashtra Election 2024: हीना गावितांमुळे शिंदेंची शिवसेना अडचणीत; 'हे' आहे बंडखोरीचं कारण
15
Crime Video: मुख्याध्यापकाची गोळ्या घालून हत्या; हादरवून टाकणारी घटना कॅमेऱ्यात कैद
16
शुक्राचा गुरु राशीत प्रवेश: १० राशींवर धनलक्ष्मी कृपा, अचानक धनलाभाचे योग; शुभ-लाभाचा काळ!
17
'भूल भूलैय्या ३'ने 'सिंघम अगेन'ला केलं धोबीपछाड! Box Office कलेक्शनमध्ये कार्तिक आर्यनचा सिनेमा ठरला सरस
18
इस्रायलचा सीरियाच्या राजधानीजवळ 'एअरस्टाईक'; दमास्कसमध्ये हिज्बुल्लाच्या तळांना केलं लक्ष्य
19
Noel Tata Joins Tata Sons : टाटा कुटुंबात १३ वर्षांत पहिल्यांदा झालं 'हे' काम, रतन टाटांच्या निधनानंतर काय बदललं?
20
Gold Price 5 Nov 2024: तेजीची हवा निघाली...! दिवाळी संपताच जोरदार आपटले सोने-चांदी! पटापट चेक करा कशी असेल आजची स्थिती?

स्थायी समितीचे आठ सदस्य निवृत्त, नव्यांची मोर्चेबांधणी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2018 3:35 AM

स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्यासह समितीतील आठ सदस्य ३० एप्रिलला निवृत्त होतील. बुधवारी झालेल्या समितीच्या सभेत उपस्थित अधिकारी व काही नगरसेवकांच्या हस्ते चिठ्ठी काढून निवृत्त सदस्यांची नावे निश्चित करण्यात आली.

पुणे : स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्यासह समितीतील आठ सदस्य ३० एप्रिलला निवृत्त होतील. बुधवारी झालेल्या समितीच्या सभेत उपस्थित अधिकारी व काही नगरसेवकांच्या हस्ते चिठ्ठी काढून निवृत्त सदस्यांची नावे निश्चित करण्यात आली.मोहोळ यांच्यासह भाजपाचे हरिदास चरवड, योगेश समेळ, बॉबी टिंगरे, (एकूण ४), रेखा टिंगरे, प्रिया गदादे (राष्ट्रवादी), अविनाश बागवे (काँग्रेस), नाना भानगिरे (शिवसेना) हे आठ सदस्य निवृत्त झाले. मोहोळ यांचेही नाव चिठ्ठीत निघाल्यामुळे त्यांना एका वर्षातच समितीतून बाहेर पडावे लागणार आहे. समितीचे आठ सदस्य दर दोन वर्षांनी निवृत्त होत असतात. समितीचेहे पहिलेच वर्ष असल्याने या वेळी निवृत्त सदस्यांची नावे चिठ्ठी काढून ठरवण्यात आली.आता पुढील वर्षी ज्यांचा दोन वर्षांचा कार्यकाल पूर्ण होईल, असे आठ सदस्य निवृत्त होतील.दरम्यान, सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांमध्ये आता प्रथम समितीत येण्यासाठी व नंतर अध्यक्षपद मिळवण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. महापौरपद महिला राखीव झाल्यामुळे ज्येष्ठ असूनही महापौरपदाची संधी हुकलेले सुनील कांबळे, महापौरांच्या प्रभागातील असल्यामुळे कोणतीच संधी न मिळालेले हेमंत रासने, तसेच शहर सुधारणा समितीत काम करण्याची फारशी संधी न मिळाल्यामुळे नाराज असलेले महेश लडकत हे समितीच्या अध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत. त्याशिवाय युवा मोर्चाचे पुणे शहराध्यक्ष असलेले नगरसेवक दीपक पोटे हेही अध्यक्षपदाच्या स्पर्धेत आहेत. युवकांना संधी द्यावी, असे त्यांचे म्हणणे असून ते त्यांनी पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवले आहे.बहुतेक समित्या तसेच स्थायी समितीसह महापौरपदाचाही कार्यकाल संपुष्टात येत असल्यामुळे येत्या महिन्यात महापालिकेत सत्ताधारी भाजपात तसेच अन्य राजकीय पक्षांमध्येही बरीच राजकीय घुसळण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. पुढील वर्षभरात शहरात अनेक नवे व मोठे प्रकल्प सुरू होत आहेत, त्यामुळे स्थायी समितीत किमान सदस्य तरी व्हावे, यासाठी विरोधी पक्षातही हालचाली सुरू आहेत.भाजपात दोन गट; पुन्हा महिलेचीच वर्णीभलीमोठी म्हणजे ९८ इतकी सदस्यसंख्या असलेल्या व सभागृहात स्पष्ट बहुमत असलेल्या भाजपातही आता नेत्यांच्या नावे दोन गट पडल्यात जमा आहे. पालकमंत्री गिरीश बापट यांना मानणाºया नगरसेवकांची संख्या जास्त आहे, मात्र दुसºया पक्षातून ऐन निवडणुकीच्या वेळी पक्षात प्रवेश घेऊन निवडून आलेल्या अनेक नगरसेवक खासदार संजय काकडे यांना मानणारे आहेत. त्यातील बरेचसे उपनगरांमधील आहेत. सत्तापदांच्या वाटपात आपल्याला खड्यासारखे बाजूला ठेवण्यात आले, अशी त्यांची भावना आहे. त्यामुळेच आता दुस-या वर्षात सत्तापद मिळवण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे.काही महिला सदस्यांनीही या पदावर काम करण्याची तयारी पक्षाकडे दर्शवली असल्याची माहिती मिळाली. भाजपाच्या एकूण सदस्यसंख्येमध्ये महिला नगरसेवकांची संख्या उल्लेखनीय आहे. मात्र महापौरपद अडीच वर्षांसाठी महिला राखीव आहे. त्याची सव्वा वर्षाची विभागणी करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यमान महापौर मुक्ता टिळक यांचा सव्वा वर्षाचा कार्यकाल संपला की त्या पदावर पुन्हा महिलेचीच वर्णी लावावी लागणार आहे. समितीचे अध्यक्षपद व महापौरपदही महिलांकडे दिले जाण्याची शक्यता कमी आहे.

टॅग्स :Puneपुणे