शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

Pimpri Chinchwad: लिव्ह इन पार्टनरसाठी अल्पवयीनकडून वृद्धेचा खून; आरोपी सराईत गुन्हेगार

By रोशन मोरे | Published: August 08, 2023 8:24 PM

आरोपी सराईत असून त्याच्या तब्बल ११ गुन्हे दाखल आहेत...

पिंपरी : लिव्ह इन पार्टनर जेलमध्ये आहे. तिला जामीन मिळवून देण्यासाठी पैशाची आवश्यकता असल्याने वृद्ध महिलाचा खून करून तिचे दागिने चोरून नेले. हत्या झालेल्या वृद्धेचे महिलेचे नाव शालूबाई रूपा साळवी (वय ८५, रा. सेनेट्री चाळ, भाजी मंडईजवळ, पिंपरी) असे आहे. धक्कादायक म्हणजे खून करणारा आरोपी हा अल्पवयीन असून मंगळवारी (दि.८) तो १८ वर्षाचा होणार आहे. आरोपी सराईत असून त्याच्या तब्बल ११ गुन्हे दाखल आहेत.

ही घटना ३० जुलै ते ३१ जुलै दरम्यान सेनेट्री चाळ, भाजी मंडळीजवळ, पिंपरी येथे घडली. या प्रकरणी वृद्धेची नात सुनिता भिमराव कांबळे (वय ४८ रा. पिंपळे गुरव) यांनी शनिवारी (दि.५) पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शालूबाई साळवी या एकट्याच राहत होत्या. त्याचा फायदा घेऊन त्याच परिसरात राहणाऱ्या आरोपीने घराचे सिमेंटचा पत्रा उचकटून घरात प्रवेश केला. शालूबाई यांना कोणत्यातरी कठीण वस्तूने डोक्यात मारून जीवे खून केला. त्यानंतर त्यांच्या अंगावरील व घरात असलेल्या कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने, मोबाइल हँडसेट आणि गॅस सिलेंडर एक लाख चार हजार ५०० रुपयांचा माल चोरून नेला.

असे पकडले आरोपीला-आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांची दोन पथके तयार करण्यात आली होती. पोलिसांनी चौकशी केली असता मृत वृद्धेच्या परिसरात राहणारा आणि गुन्हेगारी पार्श्वभुमी असेलल्या एक अल्पवयीन खूनच्या घटनेनंतर त्या भागात दिसला नसल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याला सापळा रचून आरोपीला सोमवारी (दि.७) अटक केली असता. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबूली दिली.तब्बल ११ गुन्हे दाखल-अल्पवयीन अल्पवयीन असला तरी तो नऊ ऑगस्टला १८ वर्ष पूर्ण करणार आहे. आरोपी हा सराईत गुन्हेगार असून पिंपरी, येरवडा, शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तब्बल ११ गुन्हे दाखल आहेत.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस