शिवणे : मावळातील पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूक ही चुरशीची होणार असल्याने सर्वच राज्यस्तरीय नेत्यांचे लक्ष याकडे लागले आहे. जागावाटपावेळी प्रत्येक पक्षात इच्छुकांची संख्या जास्त होती; परंतु प्रत्येकाला पक्षाचे तिकीट देणे शक्य नसल्याने ज्या इच्छुक उमेदवारांना पक्षश्रेष्ठींच्या निर्णयामुळे आपला उमेदवारीअर्ज मागे घ्यावा लागला किंवा त्यांच्या निर्णयाचा आदर ठेवून माघार घ्यावी लागली. अशा नाराज झालेल्या उमेदवारांमुळे प्रत्येक पक्षाला बंडखोरीची लागण लागली आहे. यातून भाजपासारखा सत्ताधारी पक्षही सुटला नाही. अंतर्गत नाराजी, तसेच कार्यकर्त्यांचा विरोध असूनही पक्षाने उमेदवारी दिल्याचा आरोप भाजपाचे काही कार्यकर्ते करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटबाजीमुळे मावळामध्ये समांतर राष्ट्रवादी काँग्रेस अस्तित्वात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे मावळात राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. याचाही फटका राष्ट्रवादीला बसतो किंवा काय हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. (वार्ताहर)
निवडणूक वेगळ्या वळणावर
By admin | Published: February 13, 2017 1:53 AM