पिंपरी: पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०१७ निर्भय, नि:पक्षपाती व शांततामय वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व अधिकाºयांनी समन्वयाने प्रयत्न करावेत, असे आवाहन आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सहनियंत्रण समितीच्या बैठकीत अधिकºयांना केले. स्थायी समिती सभागृहात झालेल्या निवडणूक सनियंत्रण बैठकीत ते बोलत होते.
बैठकीस अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे, आचारसंहिता कक्षप्रमुख तथा उपजिल्हाधिकारी सुरेश जाधव, निवडणूक निरीक्षक अशोक काकडे, सुनंदा गायकवाड, नैना बोंदार्डे, निवडणूक खर्च निरीक्षक सुनील कुमार, पंकज कुमार, राहुलकुमार, एम.ए. काझी, एम.के. ठाकूर, परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, सहायक पोलीस आयुक्त वैशाली जाधव-माने, राम मांडुरके, वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र भामरे, निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहल भोसले, स्नेहल बर्गे, संतोष देशमुख, सोनप्पा यमगर, मंजिरी मनोलकर, संजीव देशमुख, रुपाली आवले, वैशाली उंटवाल, एम.आर. मिसकर, अण्णासाहेब चव्हाण, पुरुषोत्तम जाधव, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आर.एन. कन्हेरकर, विक्रीकर आयुक्त प्र. द. सांगळे, मुख्य लेखापरीक्षक पद्मश्री तळदेकर, सह शहर अभियंता प्रवीण तुपे, सहायक आयुक्त डॉ. यशवंतराव माने, चंद्रकांत खोसे, मनोज लोणकर, चंद्रकांत इंदलकर, योगेश कडूसकर, आशादेवी दुर्गुडे, मिनीनाथ दंडवते, अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता श्रीकांत सवणे, रामदास तांबे, संजय घुबे, प्रदीप पुजारी, लेखाधिकारी तानाजी जगदाळे, पोलीस निरीक्षक एस.व्ही. भोसले, ए. बी. मोरे, राज्य उत्पादनशुल्क विभागाचे निरीक्षक विनय शिर्के, डी.डी. लोहकरे, एस.जे. डेरे, बँक आॅफ महाराष्ट्रचे जिल्हा समन्वय अधिकारी म. नि. काळे, नंदन नम्बियार, अॅक्सिस बँकेचे जनरल मॅनेजर भूषण वैद्य, महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाचे मुख्य अभियंता आर. डी. मुंडे, पीएमपीएमएलचे विभागीय नियंत्रक ए. एन. भिसे, मिलिंद शेवाळे आदी उपस्थित होते.