कामशेत : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकातील राग मनात धरून नाणे मावळातील काम्ब्रे गावात दोन गटांत हाणामारी झाली असून, मनसेच्या एका पदाधिकाऱ्याला जबर मारहाण करण्यात आली आहे. दोन्ही गटांनी परस्परांवर कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.दि. २१ रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास मनसे नाणे मावळ अध्यक्ष दत्ता गबळू साबळे (वय ४०, रा. साबळेवाडी, नाणे मावळ) हे आपल्या गाडीतून लक्ष्मण गायकवाड यास कोळवाडी येथे सोडवून परतत असताना गोवित्री गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेसमोर आले असता जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीतील राग मनात धरून आरोपी विजय विठ्ठल गायकवाड, रोशन संजय गायकवाड, संदीप ज्ञानेश्वर गायकवाड व इतर चार अज्ञात इसम यांनी दत्ता साबळे यांना अडवून जबर मारहाण केली. तसेच विजय विठ्ठल गायकवाड (वय ४२, रा. काम्ब्रे, नाणे मावळ) यांनी दत्ता गबळू साबळे, कांताराम गबळू साबळे, शांताराम गबळू साबळे व इतर तीन ते चार जण यांनी गाडीला हॉर्न देऊन ओव्हरटेक केला. या कारणावरून रोशन संजय गायकवाड याला दमदाटी, शिवीगाळ व लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याची तक्रार केली आहे.(वार्ताहर)
निवडणुकीतील वाद; दोन गटांत हाणामारी
By admin | Published: March 23, 2017 4:28 AM