रावेत : येथील साई ग्लॅमर हौसिंग सोसायटीमध्ये एकूण ५६ सदनिका असून, यामध्ये आॅटो, आयटी क्षेत्रासह डॉक्टर, इंजिनिअर आदी उच्च शिक्षित महाराष्ट्रातील विविध भागांतून आलेले सर्व जाती पंथाचे लोक एक कुटुंब म्हणून गुण्या गोविंदाने वास्तव्य करीत आहेत. त्या सर्वं सदनिकांमधे राहणाºया रहिवाशांचे एक मोठे कुटुंबचतयार झाले आहे.पर्यावरण संवर्धनच्या संबंधित अनेक उपक्रम साई ग्लॅमरमध्ये सतत चालू असतात. त्यामधे एसटीपी प्लॅन्टद्वारे सोसायटीचे संपूर्ण गार्डन जगविले जाते़ रेन वॉटर हार्वेस्टिंग, बागेकरिता ठिबक सिंचन, भारतीय वंशाची झाडे लावणे इत्यादींचा समावेश आहे. वीज वाचवण्याकरिता एलईडी बल्ब व ट्यूबलाईट बसवण्याचा निर्णय घेतला होता. या उन्हाळ्यात साई ग्लॅमरच्या सर्व नळांना वॉटर सेव्हिंग एरिटॉर लावून साईवासीयांनी दरदिवशी साठ हजार लिटरची पाणी बचत सुरूकेली आहे. साई ग्लॅमरमधील सर्व ओल्या कचºयाचे व सुक्या कचºयाचे नियमितपणे वर्गीकरण करून दिला जातो. या सर्वांहून महत्त्वाचे म्हणजे इतके मोठे कुटुंब अत्यंत प्रेमाने आणि जिव्हाळ्याने राहतात आणि एकमेकांच्या अडीअडचणीला धावून जातात.पारंपरिक ऊर्जास्रोतांचा वापरसोसायटीमध्ये एकूण ११ सभासद असून, व्यवसायाने आयटी इंजिनिअर असणारे गजानन शेळके अध्यक्ष म्हणून, तर आॅटो क्षेत्रात उच्च पदावर काम करणारे पंकज बोबडे सचिव म्हणून काम पाहतात. इमारतीवर सोलर सिस्टीम बसविल्यामुळे पारंपरिक ऊर्जास्रोतांचा वापर करून विजेची बचत केली जाते. पदाधिकारी आणि सदस्यांच्या नेतृत्वाखाली या कुटुंबात सतत अनेक उत्सव, समाजपरिवर्तनाचे, प्रबोधनाचे उपक्रम राबविले जातात.रेन वॉटर हार्वेस्टिंगने वाढली पाण्याची पातळीअद्ययावत तंत्रज्ञान, प्रशिक्षित सुरक्षा कर्मचारी, कोपºया कोपºयावर असेलेल्या आठ सीसीटीव्ही कॅमेºयांचे सुरक्षा कवच आणि जागरूक रहिवाशी यामुळे साई ग्लॅमर आतापर्यंत सुरक्षित आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग च्या माध्यमातून पाण्याची भूजलपातळी वाढविण्या करिता प्रयत्न केले जातात. ज्येष्ठ नागरिकांचा ग्रुप संध्याकाळी केवळ एकत्रच येत नाही तर अनेक गंमती जमतींसह एकमेकांच्या कुटुंबाविषयी आस्थेने विचारपूस करीत गप्पा रंगतात.साई ग्लॅमर सोसायटीला आयएसओ मानांकन मिळविण्याच्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू असून, सोसायटीचे सर्व कागदपत्रे डिजिटल करण्याचे काम आम्ही हाती घेतले असून, ते लवकरच पूर्ण होईल व पेपर लेस कामकाज सुरू होईल़ अध्यक्ष या नात्याने मी एकोप्यासाठी सतत तत्पर आहे़ सभासदांच्या असणाºया अडीअडचणी सोडविण्यासाठी मी नेहमी प्राधान्य देत असतो़ नोकरी सांभाळून उर्वरित वेळ माझ्या सोसायटीच्या कुटुंबासाठी देत आहे.- गजानन शेळके, अध्यक्षभविष्यात आपणाला विजेच्या समस्येला सामोरे जावे लागणार आहे. ही समस्या लक्षात घेऊन सध्या उपलब्ध असलेल्या सोलार सिस्टीममध्ये आवश्यकतेनुसार अत्याधुनिक बदल करून उच्च प्रतीचे सोलर सिस्टीम उभी करून सर्व सदनिकांना त्याच्या माध्यमातून वीजपुरवठा करण्याचा आमचा मानस असून, विजेची बचत होण्यास मदत होईल या व्यतेरीक्त लवकरच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. - पंकज बोबडे, सचिवमुलांसाठी व्यक्तिमत्त्व विकाससाई ग्लॅमरमध्ये मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासावर देखील तितकेच लक्ष दिले जाते. त्यांच्या करता दर आठवड्याला कराटे, रोलरकोस्टर, नृत्य असे अनेकविध क्लासेस घेतले जातात, तर उन्हाळ्यात पोहण्याचे प्रशिक्षण दिले जाते.पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपणसोसायटीत वर्षभर इको फ्रेंडली गणेशोत्सव, नवरात्री, गरबा, होळी, कोजागिरी असे उत्सव आणि सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. तसेच स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिन राष्ट्रीय सण साजरे केले जातात. पर्यावरण संवर्धनासाठी आम्ही परिसरात विविध झाडांचे वृक्षारोपण केले असून त्याची नियमितपणे देखभाल केली जाते.
वीज बचत करणारी सोसायटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 6:54 AM