शहरं
Join us  
Trending Stories
1
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
2
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
3
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
4
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
5
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
6
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
7
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
8
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
9
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
10
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
11
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
12
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
13
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
14
‘कोस्टल’वरून ४० लाख वाहनांची वर्दळ; वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली
15
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल
16
आकाश कोसळले तरी चालेल, न्याय दिला गेलाच पाहिजे!
17
एकत्र लढतील, दिसतील; पण एकत्र राहतील?
18
निवडणुका अनेक, देश एक!
19
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
20
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय

तीन महिन्यांपासून वीजेचा लपंडाव सुरु; महावितरण विरोधात चिंचवडमध्ये आंदोलन

By विश्वास मोरे | Published: August 21, 2024 4:49 PM

वीज नसल्यामुळे चोऱ्या वाढल्या असून या विजेच्या लपंडावामुळे अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणाचे नुकसान होऊन आर्थिक फटका नागरिकांना बसतोय

पिंपरी: चिंचवड स्टेशन, आनंद नगर परिसरात गेल्या तीन महिन्यांपासून वीजेचा लपंडाव सुरु आहे. महावितरणाच्या गलथान व नियोजन शून्य कारभाराविरोधात नागरी हक्क कृती समितीने आंदोलन केले. जनआक्रोश धडक मोर्चातून निषेध केला.   मोहननगर, चिंचवड स्टेशन, आनंदनगर, साईबाबानगर, गवळीवाडा, इंदिरानगर,  काळभोरनगर, महात्मा फुलेनगर, रामनगर, दत्तनगर, विद्यानगर, शंकर नगर, परशुरामनगर या परिसरातील वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. विजेच्या लपंडावामुळे या विभागातील नागरिक हैराण झाले होते. त्यामुळे श्री दत्त मंदिर चौक मोहननगर येथून सकाळी नागरिकांच्या जन आक्रोश धडक मोर्चाला सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांच्या नेतृत्वाखाली सुरुवात झाली. मोहननगर ते थरमॅक्स चौकातील महावितरण कार्यालयापर्यंत पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता. 

हा मोर्चा मोहननगर,  महात्मा फुलेनगर,  दत्तनगर,  विद्यानगर, शंकरनगर, रामनगर, परशुरामनगर मार्गे महावितरणच्या थरमॅक्स चौकातील आकुर्डी विभागीय कार्यालयात धडकला. त्यावेळी महावितरणचे मुख्य अभियंता अतुल देवकर, अतिरिक्त कार्यकारी अभियंता अशोक जाधव हे मोर्च्याच्या सामोरे आले.  त्यांनी मोर्चेकरांचे निवेदन स्वीकारले.  त्यावर मोर्चाच्या ६ मागण्यांबाबत मुद्दानिहाय लेखी पत्र दिले. या मोर्चामध्ये माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी, वैशाली काळभोर, संजय जगताप यांच्यासह  सामाजिक, राजकीय, व्यापार, लघुउद्योजक, हातगाडी, पथारी टपरीधारक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.मारुती भापकर म्हणाले, ' महावितरणच्या गलथान व नियोजन शून्य कारभारामुळेच अनेक नागरिकांना शारीरिक, मानसिक, आर्थिक त्रासाला सामोरी जावे लागत आहे. या समस्येचे कायमस्वरूपी निराकरण व्हावे म्हणून अनेकांनी वेगवेगळी निवेदना महावितरणला दिली होती. मात्र यावर कायमस्वरूपी कुठलाही उपाय निघाला नाही, म्हणून मोर्चा काढला. आमच्या भागात नागरिकांना डेंगू, चिकनगुनियाची साथ सुरु आहे. त्यामुळे या भागातील रुग्णालयामध्ये रुग्ण उपचार घेत आहेत. रुग्णालयामध्ये वीज नसल्याने त्रास रुग्णांना होत आहे. तसेच वीज नसल्यामुळे चोऱ्या वाढल्या असून या विजेच्या लपंडावामुळे अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणाचे नुकसान होऊन आर्थिक फटका नागरिकांना बसत आहे.'' 

टॅग्स :PuneपुणेagitationआंदोलनmahavitaranमहावितरणelectricityवीजMONEYपैसाSocialसामाजिक