कामशेत : येथील नाणे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मारुती मंदिराजवळ ऊसवाहतूक करणारा ट्रॅक्टर रस्त्याकडेला असलेल्या विजेच्या खांबाला धडकला. खांबाचे दोन तुकडे झाले. शिवाय वीज प्रवाह सुरू असलेल्या तारा रस्त्यावर पडून मोठी र्स्पाकिंग झाल्याने काही काळ रस्ता वाहतूक ठप्प झाली. अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला.
कामशेत शहरातून नाणे मावळात जाणाºया नाणे रोडवर जोशी वाड्याशेजारी मारुती मंदिराच्या बाजूला असलेल्या महावितरण मंडळाच्या सिमेंटच्या खांबाला बुधवारी (दि. १४) दुपारी बाराच्या सुमारास ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर धडकला. त्यात या खांबाचे दोन तुकडे तर झालेच, शिवाय विद्युतप्रवाह सुरू असलेल्या तारा रस्त्यावर पडल्याने वाहतूक ठप्प होऊन दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. कामशेत महावितरण मंडळाचे कर्मचाºयांनी त्वरित मुख्य वीजवाहिनी बंद केल्याने मोठा अपघात टळला. या विषयी कामशेत महावितरण कार्यालयातील अधिकाºयांशी संपर्क साधला असता, त्यांनी मी सुटीवर आहे, असे सांगितले. पण येथील कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.
कामशेतमधील नाणे रोडचे रेल्वे गेट उघडले. वाहने ये-जा करू लागली. यातच ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर कामशेत दिशेने जात असताना नियंत्रण सुटून विजेच्या खांबाला धडकला. यात या सिमेंटच्या विजेच्या खांबाचे दोन तुकडे झाले व चालू लाइन रस्त्यावर पडल्यानेवाहतुकीचा मोठा खोळंबा झाला. शिवाय र्स्पाकिंग होऊ लागल्याने आजूबाजूच्या नागरिकांनी याबाबत महावितरण कार्यालयात कळवले असता, कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी मुख्य प्रवाह बंद केला. विजेच्या तारा बाजूला करून रस्ता खुला करण्यात आला.