देहूरोड : मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवरील देहूरोड येथील लोहमार्गावरील उड्डाणपूल जोडणाऱ्या एलिव्हेटेड रस्त्याच्या कामाला दिवाळीनंतर गती आली असून, संपूर्ण एक किलोमीटर रस्त्याच्या डांबरीकरणास सुरुवात झाली आहे. पहिला थर टाकण्याचे काम वेगात सुरू असल्याचे दिसून येत आहे. एलिव्हेटेड रस्ता येत्या डिसेंबरअखेर वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
देहूरोड येथील पुलाच्या एलिव्हेटेड संपूर्ण रस्त्याचे डांबरीकरणाचा पहिला थर पूर्ण झाल्यानंतर विद्युतवाहिनी टाकणे, पथदिवे खांब बसवून त्यावर पथदिवे बसविणे, सिमेंट कठडे व पिलर आदी रंगरंगोटी करणे, वाहतुकीचे मार्गदर्शक व सुरक्षेबाबत फलक लावणेसह उर्वरित अनुषंगिक सर्व कामे होऊन काम येत्या डिसेंबरअखेर (दीड महिन्यात) काम पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता व संबंधित कत्राटदाराच्या वरिष्ठ अधिकाºयांनी स्पष्ट केले आहे. सर्व कामे झाल्यानंतर एक किलोमीटर अंतराच्या पूर्णत्वास येत असलेल्या एलिव्हेटेड रस्त्याने मुंबईकडून येणारी सर्व प्रकारची वाहने लोहमार्ग उड्डाणपुलावरून व पुण्याहून येणारी वाहने आयुध निर्माणीपासून एलिव्हेटेड रस्त्याने कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या डॉ़ बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयाजवळून थेट शहराबाहेर जाणार असल्याने देहूरोड बाजारपेठ भागातील दोन्ही मुख्य चौकांसह इतर भागातीलही वाहतूककोंडी सुटणार आहे.महामार्ग सेवा दुरुस्ती जानेवारीत होणार सुरूएलिव्हेटेड रस्त्याने थेट जाणारी वाहतूक सुरू झाल्यानंतर सेवा रस्त्यावरील वाहनांची वर्दळ कमी होणार असून, त्यानंतर रस्ते विकास महामंडळाच्या कंत्राटदारामार्फत विविध ठिकाणी दुरवस्था झालेला व दोन्ही बाजूंचा खचलेला सेवा रस्ता खोदून पुन्हा आधुनिक पद्धतीने डांबरीकरणाचे काम आगामी वर्षात जानेवारीत करण्यात येणार आहे.दोन बाजूंना खोदकाममुंबई -पुणे राष्ट्रीय महामार्गावरील देहूरोड येथील लोहमार्गावरील उड्डाणपूल व बाजारपेठ भागातून पुढे डॉ़ बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयापर्यंत एक किलोमीटर लांबीचा एलिव्हेटेड रस्ता पुण्यातील मे. टी़ अँड टी़ इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड यांच्यामार्फत करण्यात येत आहे. या कामासाठी ४३ कोटी २० लाख रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे.
डिसेंबर २०१६ मध्ये कंत्राटदारास कामाचे आदेश दिल्यानुसार संबंधित कंत्राटदारास मे २०१८ मध्ये देहूरोड येथील एक किलोमीटरचा एलिव्हेटेड रस्ता व लोहमार्गावरील उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी आवश्यक कामे वेगात सुरू असल्याचे चित्र सुरुवातीला दिसत होते. मात्र मुदत संपल्यानंतरही एलिव्हेटेड रस्त्याचे काम अर्धवट असल्याचे दिसत आहे. उड्डाणपुलाच्या भराव बांधकाम पूर्ण झाले आहे. लोहमार्गावरील मुख्य उड्डाणपूल बांधकामासाठी लोहमार्गाशेजारी दोन्ही बाजूंना खोदकाम करण्यात येत आहे.४संपूर्ण कामे मे २०१८ अखेर पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र रेल्वेकडून मिळणाºया मंजुरीस विलंब झाल्याने विविध कारणांमुळे संबंधित कामे अद्यापही अर्धवट असल्याचे दिसत आहे.