शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
3
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
4
"अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
5
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
6
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
7
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
8
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
9
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
10
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
11
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
12
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
13
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न
14
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी
15
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
16
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
17
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
18
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
19
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
20
Gold Silver Price Today 26 November: सोनं ४,२३० आणि चांदी १०,२४० रुपयांनी झालं स्वस्त; आता इतक्या किंमतीत मिळतंय १० ग्राम सोनं

महापालिकेची पदाधिकाऱ्यांच्या दौऱ्यांवर उधळपट्टी सुरूच

By admin | Published: May 25, 2016 4:44 AM

महापालिकेच्या वतीने पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांच्या दौऱ्यांवर उधळपट्टी सुरूच आहे. महापौरांच्या सिक्कीम दौऱ्यानंतर सत्तारूढ पक्षनेत्या मंगला कदम सिक्कीम दौऱ्यावर गेल्या आहेत.

पिंपरी : महापालिकेच्या वतीने पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांच्या दौऱ्यांवर उधळपट्टी सुरूच आहे. महापौरांच्या सिक्कीम दौऱ्यानंतर सत्तारूढ पक्षनेत्या मंगला कदम सिक्कीम दौऱ्यावर गेल्या आहेत. पुढील आठवड्यात महिला बालकल्याणच्या सदस्या आणि महापौर शकुंतला धराडे या बर्लिन दौऱ्याला जाणार आहेत. महापौरांच्या दौऱ्याला शासनाचा हिरवा कंदील मिळण्याची प्रतीक्षा आहे. महापालिकेचे अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांच्या दौऱ्यांवर लाखो रुपयांची उधळपट्टी होत आहे. गेल्या चार वर्षांत सुमारे तीस लाख रुपयांची उधळपट्टी दौऱ्यांवर झाली आहे. राज्यात दुष्काळाची पार्श्वभूमी असताना आणि पुणे महापालिकेचे पदाधिकारी दुष्काळी भागाची पाहणी करण्याकरिता गेले असताना पिंपरी-चिंचवड महापालिकेचे पदाधिकारी अभ्यास दौऱ्यांच्या नावाखाली सहलीचा आनंद लुटत आहेत. मागील महिन्यात महापौर शकुंतला धराडे यांच्यासह पर्यावरण, जैवविविधता समितीचे पदाधिकारी दौऱ्यांवर गेले होते. त्यासाठी सुमारे आठ लाखांचा खर्च करण्यात आला होता. या दौऱ्यात सत्तारूढ पक्षनेत्या मंगला कदम या गेल्या नव्हत्या. त्यामुळे मंगळवारी कदम यांच्यासह सात सदस्य सिक्कीम दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. त्यात मंदाकिनी ठाकरे, सुजाता पालांडे, सविता साळुंखे, सुमन नेटके आणि वैशाली काळभोर या नगरसेविकांचा समावेश आहे. या दौऱ्यावर महापालिका ३ लाख ८० हजार रुपये खर्च करणार आहे. तर महापालिकेतील महिला आणि बालकल्याण समितीच्या सदस्यांसह नऊ जण ९ ते १६ जून रोजी केरळ दौऱ्यावर जाणार आहेत. त्यासाठी सुमारे चार लाख खर्च अपेक्षित आहे. महापौर शकुंतला धराडे यांना पुढील महिन्यात बर्लिनला जाणार आहेत. या दौऱ्यासाठी त्यांनी शासनाकडे परवानगी मागितली आहे. (प्रतिनिधी)दौऱ्यांवरील उधळपट्टी थांबवापदाधिकारी आणि अधिकाऱ्यांच्या अनावश्यक दौऱ्यांवरील उधळपट्टी थांबवावी, अशी मागणी विरोधी पक्षांच्या नेत्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. मात्र, महापालिकेतील सत्तेच्या जोरावर दौऱ्यांवर होणाऱ्या उधळपट्टीची गरज आहे. ती रोखण्याची गरज आहे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.