पिंपरी : रोजगार मेळाव्यातून मिळणाऱ्या संधीचा बेरोजगार तरुणांनी फायदा घेऊन स्वत:च्या उज्ज्वल भविष्याची वाटचाल करावी. महापालिका व शासनाच्या स्वयंरोजगार विभागाच्या सहकार्याने दर तीन महिन्यांनी अशा बेरोजगार मेळाव्याचे आयोजन करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे प्रतिपादन महापौर नितीन काळजे यांनी केले.महापालिका नागरवस्ती विकास योजना विभागाकडील दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान व जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विकास मार्गदर्शन केंद्र, पुणे यांच्या वतीने आॅटो क्लस्टर, चिंचवड येथे आयोजित रोजगार मेळाव्याचे उद्घाटन महापौर काळजे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. रोजगार मेळाव्यामध्ये पुणे जिल्ह्यातील ५४ विविध कंपन्यांमधील ४१६० रिक्त पदांसाठी दहा हजारापेक्षा जास्त उमेदवारांनी उपलब्ध कंपनीच्या मनुष्यबळ विकास प्रतिनिधींकडे नोकरीसाठी अर्ज दाखल केले. या कार्यक्रमास आयुक्त दिनेश वाघमारे, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विकास मार्गदर्शन केंद्राचे सहायक संचालक गंगाधर सांगडे, नगरसदस्य तुषार हिंगे, केशव घोळवे, अंबरनाथ कांबळे, नगरसदस्या अनुराधा गोरखे, सीमा चौगुले, माधवी राजापुरे, सुलक्षणा धर, प्रियंका बारसे, सहायक आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर, अण्णा बोदडे, समाजविकास अधिकारी संभाजी ऐवले, सहायक समाज विकास अधिकारी सुहास बहादरपुरे, अमित गोरखे आदी उपस्थित होते.आयुक्त वाघमारे म्हणाले, ‘‘सरकारी नोकऱ्यांचे प्रमाण अत्यल्प झाले आहे. सरकारी नोकरीमागे न धावता मार्केटमध्ये मागणी असलेल्या नोकरीसंदर्भातील कौशल्याचे प्रशिक्षण घेऊन सुशिक्षित बेरोजगारांनी रोजगार उपलब्ध करून घ्यावा. (प्रतिनिधी)
दर तीन महिन्यांनी रोजगार मेळावा
By admin | Published: March 25, 2017 3:44 AM