वाकड : अंगणात खेळताना मोटारीखाली येऊन १४ महिन्याच्या चिमुरडीचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना शनिवारी (दि. १६) रोजी सकाळी अकराच्या सुमारास दत्त मंदिरा शेजारी वाकड रस्त्यावर घडली.खुशी सुरेश चौधरी (वय १) असे त्या चिमुरडीचे नाव असून चालक अरविंद कलाटे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्त मंदिरा शैलेजारी अनेक छोट्या गल्ली आहेत. येथेच कलाटे यांच्या चाळीत चौधरी कुटुंबीय भाड्याने राहतात. त्याला लागूनच अरविंद कलाटे यांचे घर आहे. अरविंद इनोव्हा मोटार रिवर्स घेता असताना अंगणात खेळणारी खुशी खेळता खेळता घरासमोर असलेल्या अंतर्गत रस्त्यावर आली आणि मोटारीच्या मागच्या चाकाखाली सापडल्याने तिचा दुर्दैवी अंत झाला. तिचे वडिल सुरेश एका हॉटेलमध्ये कुकचे काम करतात.
मोटारीखाली सापडून वाकड येथे चिमुरडीचा अंत; चालकावर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 3:34 PM
अंगणात खेळताना मोटारीखाली येऊन १४ महिन्याच्या चिमुरडीचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना शनिवारी (दि. १६) रोजी सकाळी अकराच्या सुमारास दत्त मंदिरा शेजारी वाकड रस्त्यावर घडली.
ठळक मुद्देअकराच्या सुमारास दत्त मंदिरा शेजारी वाकड रस्त्यावर घडली घटनाचालक अरविंद कलाटे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल