शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

अखेर झालं मनोमिलन.. ! खासदार बारणे अन् जगताप यांची होणार प्रेस कॉन्फरन्स 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2019 2:02 PM

बारणे आणि जगताप यांच्यात छत्तीसचा आकडा होता. मात्र लोकसभा निवडणुकीला दोघांच्या पक्षाची युती झाली.

पिंपरी - मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना-भाजप-रिपाइं-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार,  विद्यमान खासदार श्रीरंग बारणे आणि पिंपरी-चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष, चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे आज सोमवारी संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. त्यामुळे दोघांमध्ये मनोमिलन झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र पत्रकार परिषदेत काय होणार याबाबत उत्सुकता आहे.पिंपरीत एक वाजता बारणे आणि जगताप दोघे संयुक्तपणे पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहेत. त्यामुळे त्यांच्यातील नाराजीवर पडदा पडला असून मनोमिलन झाले आहे. बारणे आणि जगताप यांच्यात छत्तीसचा आकडा होता. मात्र लोकसभा निवडणुकीला दोघांच्या पक्षाची युती झाली. युतीच्या फॉर्म्युल्यानुसार मावळची जागा शिवसेनेकडेच राहिली. बारणे यांनाच पुन्हा शिवसेनेची उमेदवारी मिळाली. युती धमार्चे पालन करू अशी हमी जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली होती.  तर,  बारणे यांनी पंतप्रधानपदी पुन्हा नरेंद्र मोदी यांना बसविण्यासाठी मित्र पक्षाचे काम करावे, असे आवाहन केले होते.शिवसेना-भाजप नेत्यांनी बारणे आणि जगताप यांच्यात 'समेट' घडविण्यासाठी प्रयत्न केला. मावळ मतदारसंघ जिंकणे किती महत्वाचे आहे हे सांगितले. त्यानंतर दोघांनीही एक पाऊल माघे घेतले. बारणे यांनी यापूर्वीच मतभेदाला पूर्णविराम दिला होता. त्यानंतर जगताप यांनी देखील एक पाऊल मागे घेतले आहे. मात्र पत्रकार परिषदेत काय होणार याबाबत उत्सुकता आहे. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडmaval-pcमावळLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकBJPभाजपाShiv Senaशिवसेना