शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

मतदारराजाचा उत्साह

By admin | Published: February 22, 2017 2:52 AM

जिल्हा परिषदेच्या ५ गटांसाठी, तर पंचायत समितीच्या १० गणांसाठी मंगळवारी मावळात सरासरी ८० टक्के

वडगाव मावळ : जिल्हा परिषदेच्या ५ गटांसाठी, तर पंचायत समितीच्या १० गणांसाठी मंगळवारी मावळात सरासरी ८० टक्के मतदान झाले. ६४ उमेदवारांचे भवितव्य मतदारांनी मशिनमध्ये बंद केले. तालुक्यात १ लाख ३७८ मतदार असून यामध्ये ९३ हजार ३५३ पुरुष तर ८४ हजार २५ महिला मतदार आहेत. ३.३० वाजेपर्यंत तालुक्यात ९८३८२ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. सकाळी ७.३० वाजता अतिशय संथ गतीने सुरु झालेले मतदान ११ वाजता काहीसे वेगाने सुरु झाले. मतदार उशिरा येण्यास सुरुवात झाल्याने काही मतदान केंद्रावर सायंकाळी ७पर्यंत रांगा पाहायला मिळाल्या. याउलट शहरी भागात सकाळपासूनच मतदानासाठी मतदारांची गर्दी दिसून येत होती. ग्रामीण भागात तुरळक गर्दी पहावयास मिळाली. तालुक्यात सकाळी ९.३० वाजेपर्यंत ९.५५ टक्के मतदान झाले. यानंतर मतदार राजा बाहेर पडल्यामुळे साडेअकरा वाजेपर्यंत २३.९३ टक्के मतदान झाले होते. दुपारी १.३० वाजेपर्यंत ४०.५१ टक्के , ३.३० वाजेपर्यंत ५५.७८ टक्के मतदान पार पडले.मतदारांकडून मतदान करवून घेण्यासाठी कार्यकर्त्यांची धावपळ दिसून येत होती. चारच्या पुढे मात्र कार्यकर्त्यांनी मतदारांना घरातून बाहेर काढण्यास सुरुवात केल्यामुळे मतदारांचा जोर काहीसा वाढलेला दिसला. सायंकाळी पाच वाजेपर्यंत तालुक्यात कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. सगळीकडे मतदान शांततेत पार पडले. ग्रामीण भागात उमेदवारांनी मतदारांना घरपोच आणण्यासाठी वाहने पाठवल्याचे चित्र दिसत होते. तालुक्यात सर्वांत प्रतिष्ठेची लढत असलेल्या वडगाव-खडकाळा गटात पोलिसांनी संवेदनशील केल्याने मोठ्या प्रमाणत बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तालुक्यात एकूण २१६ केंद्रांवर मतदान पार पडले. तालुक्यातील ३ मतदान केंद्रांना आदर्श मतदान केंद्र घोषित करण्यात आले होते. या मतदान केंद्रावर पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या मतदारांना गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. मतदारांनी मतदानासाठी दुपारी उशिरा येणे पसंत केल्यामुळे सायंकाळी साडेसातपर्यंत मतदान केंद्रावर लांबच लाब रांगा दिसत होत्या. यामध्ये वडगाव गणामध्ये ७०.२२ टक्के मतदान झाले. खडकाळा गणामध्ये ७२.१३ टक्के मतदान पार पडले. (वार्ताहर)मतदान केंद्रात मोबाईलचा सर्रास वापर  तालुक्यातील अनेक ठिकाणच्या मतदान केंद्रावर मतदानासाठी आलेले नागरिक मतदान करताना मशीन मध्ये आपण कोणत्या उमेदवाराला मतदान करत आहोत कोणते बटन दाबत आहेत याचे मोबाईल मध्ये चित्रीकरण करत असताना आढळल.े हे मतदार लगेच तो फोटो सोशल मीडियावर देखील फिरवत होते. यावेळी मतदान केंद्रात अधिकारी काय करत होते?अशा मतदारांना त्यांनी रोखले का नाही? असे अनेक प्रश्न नागरिकांनी यावेळी उपस्थित केले.