बारामती : बारामती, इंदापूर तालुक्यातील ऊसपिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढीस लागला आहे. त्यामुळे साखर उता:याबरोबरच ऊस उत्पादनात घट येण्याची भीती शेतकरीवर्गातून व्यक्त केली जात आहे. कृषितज्ज्ञांनी नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने, ढगाळ हवामानाने करपा रोग वाढीस लागल्याची शक्यता व्यक्त केली आहे.
बारामती ,इंदापुर तालुक्यातील फलोत्पादक शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.त्याबरोबरच आता तालुक्यातील ऊसउत्पादक शेतक:यांच्या जीवाला घोर लावला आहे. या रोगामध्ये ऊस पिकावर तांबडा ठीपका तयार होतो.त्यानंतर पांढरा ठीपका वाढीस लागुन त्याची पावडर तयार होते. बारामती तालुक्यातील विविध ठीकाणी ऊसक्षेत्रवर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसुन येते. त्यामुळे ऊसउत्पादकांवर चिंतेचे चावट आहे.
छत्रपती कारखान्याचे ऊस विकास अधिकारी प्रमोद दिवसे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की,छत्रपती च्या कार्यक्षेत्रत ऊसावर तांबेरा चा मोठय़ा प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे.वातावरणातील बदल,पाण्याचा ताण आदी कारणांमुळे ऊसावर या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याची शक्याता आहे.
कार्यक्षेत्रतील गुणवडी, ढेकळवाडी, सोनगाव आदी ठिकाणी तांबेराचा प्रादुर्भाव दिसून आला आहे.त्यामुळे साखर उता:यासह उत्पादनावर देखील परीणाम होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
कृषीतज्ज्ञ बी. एस. घुले म्हणाले की, अंतर ठेवून ऊस पिकाची लागण करावी. कोरडय़ा, उष्ण हवामानात या रोगाचा प्रादूर्भाव कमी होतो. हवा, पाणी, पाऊस, कीटक याद्वारे रोगाचा प्रसार होतो. शेतक:यांनी त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी रोगग्रस्त पाने काढून टाकावीत. त्यानंतर बुरशीनाशक औषधांची 8 ते 1क् दिवसांच्या अंतराने फवारणी करावी. त्यामुळे उसावर होणारा रोगाचा प्रादरुभाव रोखता येईल. (वार्ताहर)
4कृषितज्ज्ञ बी. एस. घुले यांनी सांगितले की, ढगाळ हवामान, पाण्याचा ताण, पाण्याची दलदल आदीमुळे या रोगाचा प्रसार होतो. या रोगामुळे प्रकाश संश्लेषन क्रीया कमी होते. उसाची वाढ खुंटते. तर एकरी 6 ते 8 टन ऊस उत्पन्न कमी होण्याचा धोका आहे. त्यासाठी खेळती हवा, सूर्यप्रकाश राहील, याची काळजी घ्यावी.
4ऊस वाढीच्या अवस्थेनुसार शिफारस केल्याप्रमाणो नत्रची मात्र योग्यवेळी द्यावी. 86क्32, 265 या ऊस जातींवर तांबेराचे प्रमाण कमी आहे. मात्र, याशिवाय रोग प्रतिकारक क्षमता कमी असणा:या वाणाच्या ऊस पिकावर हा रोग पसरतो. रोग प्रतिबंधात्मक जातींचा लागवडीसाठी वापर करावा.