लोकमत न्यूज नेटवर्कपिंपळे गुरव : येथील मराठवाडा जनविकास संघ संचालित मराठवाडा चारिटेबल ट्रस्ट पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने मराठवाडा जनविकास संघ संचालित मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून मराठवाड्यात १००१ झाडे लावण्याचा शुभारंभ करण्यात आला. त्यामधील पहिला टप्पा तुळजापूर, बिजनवाडी, चिंचोली येथे करण्यात आला. या वेळी झाडे लावून त्यांना दोन वर्ष टँकरने पाणी घालून त्यांचे संगोपन संघाच्या वतीने करण्यात येणार आहे़ आपण जर प्रत्येकाने एका झाड जगवणारच अशी जबाबदारी घेतली तर, मराठवाडा हा दुष्काळग्रस्त म्हणून ओळखला जातो तो येणाऱ्या काळात हरित मराठवाडा म्हणून ओळखला जाईल, असे संघाचे अध्यक्ष अरुण पवार यांनी सांगितले.मुकुंद डोंगरे यांनी सांगितले की, आम्ही हे लावलेली झाडे जबाबदारीने सांभाळू मराठवाडा जनविकास संघाने १००१ झाडे लावले त्यामधील एकही झाड सुकले जाणार नाही किंवा वाया जाणार नाही याची ग्वाही देतो. नितीन चिलवंत यांनी सांगितले की, पर्यावरण संतुलन बिघुडून आॅक्सिजनचे प्रमाण कमी झाले त्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात, या समस्येकडे दुर्लक्ष करून चालणार नाही़ या वेळी उपस्थित शिवानंद महाराज (विश्वस्त दत्त साई सेवा आश्रम कासारवाडी), बालाजी पवार, भैरुजी मंडले, श्रीनिवास बडे, सचिन रोचकरी, विशाल रोचकरी, अध्यक्ष प्रक्षाळ मंडळ तुळजापूर पंकज शहाणे, बंटी गंगणे, आनंद दादा कुदळे, महेश गुंड, सूर्यकांत कुरुलकर, गोरख भोरे, हरिभाऊ पाटील, दत्तात्रय धोंडगे, वामन भरगंडे, शिवाजी सुतार, शिवलाल जस्वाल, महादेव बनसोडे, मारुती बानेवार, शिवकुमार बायस, दीपक जाधव, गोपाळ माळेकर, सूरज कारकर, अनिसभाई पठाण, शिवाजी घोडके, संतोष जगताप, नरेंद्र माने, राजेश गाटे, दिनेश वाकचौरे, नितीन उघडेपाटील आदी उपस्थित होते.
वृक्षारोपणातून पर्यावरणाचा संदेश
By admin | Published: June 28, 2017 4:08 AM