खडकी : बालकाला कडेवर घेऊन लोकांची सहानुभूती मिळवत, एक अठरा ते वीस वर्षांची तरुणी शहराच्या विविध भागांत भीक मागताना दिसून येत होती. त्यांचे कोरेगाव पार्क येथे टिपलेले छायाचित्र व्हॉट्सअॅपवर व्हयरल झाले होते. भीक मागण्यासाठी बालक चोरले असावे, असा संशय व्हॉट्स अॅपवर व्यक्त करण्यात आला होता. खडकी परिसरात बालकाला कडेवर घेऊन फिरणाऱ्या मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतले. तिच्याकडे चौकशी केली असता, पालकांनीच बालक मुलीकडे भीक मागण्याच्या उद्देशाने सोपविले असल्याची
बाब निदर्शनास आली. बालकाच्या आई-वडिलांसह, नातेवाईक असलेल्या मुलीवर कायदेशीर कारवाई करण्यात आली.व्हॉट्स अॅपवर व्हायरल झालेल्या छायाचित्रातील गोंडस बालकाला कडेवर घेऊन भीक मागणारी मुलगी खडकी बाजार परिसरात असल्याची माहिती खडकी पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक मोहिनी डोंगरे यांना मिळाली. त्यांनी पोलीस हवालदार दुबळे व महिला स्टाफसह खडकी बाजारात जाऊन खात्री केली. बालकासह तरुणीला खडकी पोलीस ठाण्यात आणले. तिच्याकडे विश्वासात घेऊन चौकशी केली असता बालक मामेभावाचे असल्याचे तिने सांगितले. तिच्या मामेभावाला खडकी ठाण्यात बोलावून घेतले. मामेभावाने आमच्या संमतीने भीक मागण्यासाठी बाळ तिच्या ताब्यात दिल्याची धक्कादायक बाब त्यांनी कबूल केली. बालकाचे वडील विजय सार्जन पवार, आई शालन पवार आणि १९ वर्षांची तरुणी मेघा निमन भोसले या तिघांना भिक्षा प्रतिबंधक अधिनियमाप्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले.व्हॉट्सअॅपवर व्हायरल झालेल्या छायाचित्रातील गोंडस बालकाला कडेवर घेऊन भीक मागणारी मुलगी खडकी बाजारात असल्याची माहिती खडकी पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक मोहिनी डोंगरे यांना मिळाली. पोलीस हवालदार दुबळे यांनी बाजारात जाऊन खात्री केली. बालकासह तरुणीला खडकी पोलीस ठाण्यात आणले.