शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

पिंपरी महापालिकेच्या मदतीने दररोज ३० हजार लोकांना मदतीचा हात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2020 8:28 PM

कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून सध्या लॉकडाऊन सुरू

ठळक मुद्देगरजू नागरिकांना अन्न आणि शिधा स्वयंसेवी संस्थांच्या सहकायार्तून विविध भागात दररोज वाटपदिव्यांग, कामगार व विद्यार्थ्यांना घरपोच जेवण देणे अथवा न देण्याचे अधिकार संबंधित संस्थेचे

पिंपरी : कोरोना विषाणू संसगार्मुळे आपत्कालीन परिस्थिती उद्भवली आहे. या कालखंडामध्ये शहरातील गरजू व्यक्तींपर्यंत अन्न आणि शिधा पोहचविण्यासाठी महापालिका स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून समन्वय साधत आहे. या कार्यात सहभागी झालेले स्वयंसेवक स्वत:ची काळजी घेऊन प्राप्त परिस्थितीमध्ये आपले योगदान देत आहेत. या यंत्रणेव्दारे शहरातील विविध भागातील सुमारे २९,९५३ गरजू व्यक्तींना डब्बे व फूड पॅकेटमार्फत अन्न वाटप करण्यात आले असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्तांनी दिली.     कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून सध्या लॉकडाऊन सुरू आहे. अशा परिस्थितीत गरजू नागरिकांना अन्न आणि शिधा स्वयंसेवी संस्थांच्या सहकायार्तून शहरातील विविध भागात दररोज वाटप करण्यात येत आहे. महापालिकेच्या वतीने कार्यकारी अभियंता यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाची स्थापना करून या प्रक्रियेचे व्यवस्थापन करण्यात आले आहे.विश्व हिंदू परिषद, इस्कॉन, बजरंग दल, लक्ष्य फाउंडेशन, राकेश वाकोर्डे फाउंडेशन, समप्रिय, पीसीसीएफ, पोलीस मित्र नागरिक संघटना, अग्रसेन संघटना, शिवभोजन, संस्कार सोशल फाउंडेशन, धर्म विकास संस्था सहभागी झाल्या आहेत. रोजगार नसणाऱ्या अथवा स्थलांतरित मजुरांसाठी ३११ ठिकाणी निवारा केंद्र सुरू करण्यात आले आहेत. त्यामध्ये २१३ नागरिक राहत असून त्यांनाही निवारा व भोजनासह तपासणीची सुविधा केली आहे.अ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत उर्दू शाळा खंडोबामाळ, आकुर्डी येथे ७८, ब क्षेत्रीय कार्यालयांतर्गत केशवनगर विद्यालय येथे ३६, ड क्षेत्रीय कार्यालयांतर्गत पिंपळे सौदागर येथील अण्णासाहेब मगर विद्यालय येथे २१, इ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत छत्रपती शिवाजीमहाराज विद्यालय, भोसरी येथील संकुलात ४३, ह क्षेत्रीय कार्यालयांतर्गत दापोडी येथील हुतात्मा भगतसिंग विद्यालय येथे १८, तर पिंपरी येथील रात्र निवारा केंद्रात १७ असे एकूण २१३ स्थलांतरित मजुरांची व्यवस्था केली  आहे.

दिव्यांग, मजूर, कामगारांनाही मदत कोरोनाचा  विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन चालू आहे. अशा परिस्थितीत उदरनिवार्हाचे साधन नसणाºया गरजू पिंपरी-चिंचवड शहरातील दिव्यांग, मजूर, कामगार, व विद्यार्थ्यांना घरपोच मोफत भोजन देण्यासाठी जनकल्याण समिती व श्री काळभैरवनाथ उत्सव समिती या स्वयंसेवी संस्था पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या समन्वयातून कार्यरत आहेत. शहरातील गरजूंना याचा लाभ देण्यात येणार असल्याने अशा गरजू व्यक्तींनी चिंचवडसाठी ९५५२५७८७२६, भोसरीसाठी ८६०५७२२७७७, आकुडीर्साठी ८६०५४२२८८८, पिंपळे सौदागरसाठी ७८८७८६८५५५ या क्रमांकावर संपर्क साधावा.अजित पवार म्हणाले, दिव्यांग, मजूर, कामगार, व विद्यार्थ्यांना घरपोच जेवण देणे अथवा न देण्याचे अधिकार संबंधित संस्थेचे असल्याची नोंद संबंधितांनी घ्यावी. सोमवारपासून मोफत भोजन पुरविण्याची सुविधा कार्यान्वित होणार आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस