शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
4
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
5
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
6
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
7
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
8
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
9
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
10
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
11
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
13
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
14
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
15
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
16
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
17
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
18
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
19
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
20
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा

माजी माननीयांची चमकोगिरी, महापालिका पदाधिका-यांचे विनापरवाना फलक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 4:12 AM

पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरातील विनापरवाना फलकांवर दंडात्मक कारवाई प्रशासनाकडून केली जाते. मात्र, महापालिकेतील विविध माजी पदाधिकारी झाल्यानंतरही सार्वजनिक जागेतील नामफलक आणि दिशादर्शक फलकांना अभय देण्याचे काम सत्ताधारी आणि प्रशासनाकडून होत आहे.

- विश्वास मोरेपिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरातील विनापरवाना फलकांवर दंडात्मक कारवाई प्रशासनाकडून केली जाते. मात्र, महापालिकेतील विविध माजी पदाधिकारी झाल्यानंतरही सार्वजनिक जागेतील नामफलक आणि दिशादर्शक फलकांना अभय देण्याचे काम सत्ताधारी आणि प्रशासनाकडून होत आहे. माननीयांच्या चमकोगिरीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. उद्योगनगरीतील चमकोगिरी रोखणार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.महापालिकेत पदाधिकारी झाल्यानंतर ‘निवास स्थानाकडे’ असा दिशादर्शक फलक लावण्याची पद्धत आहे. महापालिकेत परिसरातही पदाधिकाºयांचे फलक मोठ्या प्रमाणावर दिसत आहे. एका पदाधिकाºयाच्या घराकडे येणारे जेवढे रस्ते असतील तिथे फलक लावले जातात. किती फलक लावावेत, किती खर्च करावा याबाबतचे धोरण महापालिकेचे नाही.विविध भागांत मनमानीपद्धतीने हे फलक उभारले आहेत. विद्यमान पदाधिकारी सदस्यांचे फलक असणे गरजेचे असले तरी माजी आमदार, खासदार, माजी नगरसेवक किंवा महापौर, माजी महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, विधी समिती सभापती, स्वीकृत सदस्य, प्रभाग समिती सदस्य असे फलक उभारले जातात. त्यावर किती उधळपट्टी होते, याबाबत चौकशी करण्याची गरज आहेत. असे फलक भोसरी, चिंचवड, आकुर्डी, पिंपळे गुरव, सांगवी, दापोडी, थेरगाव, वाकड, ताथवडे, पिंपळे सौदागर, पिंपळे निलख, चिखली, निगडी, कासारवाडी अशा विविध भागांत दिसून येत आहेत.फलकांनीही टाकली कातमहापालिकेत सत्तांतर झाले. त्याचा परिणाम फलकांवरही झाला आहे. यापूर्वी महापालिका क्षेत्रात एकाच रंगाचे फलक होते. हिरवा आणि पांढरा असा फलकांना रंग होता. त्यात एकसूत्रीपणा होता. मात्र, आता सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांच्या पाट्यांवर भाजपाचे रंग दिसू लागले आहेत.स्थायी समिती सभापतीच्या विद्यमान समितीच्या फलकांचा रंग बदलला आहे. सत्ताधारी बदलले की महापालिका सदस्यांच्या पाट्यांचा रंग बदलणे चुकीचे आहे. पाट्यांच्या रंगाविषयीचे आणि कोणत्या सदस्यांना नियमानुसार किती फलक लावता येतील याचे धोरण ठरविण्याची गरज आहे.कारवाई करायला हवीमहापालिका क्षेत्रात माजी पदाधिकाºयांचे फलक त्यांच्या कालखंडानंतरही सार्वजनिक जागेमध्ये लावलेले आहेत. त्यांच्यावर महापालिका प्रशासनाच्या वतीने कारवाई केली जात नाही. अन्य रस्त्यावर कोणी फलक लावला की त्यांवर महापालिकेचा अतिक्रमण विभाग कारवाई करतो. मात्र, माजी पदाधिकाºयांच्या फलकांना अभय दिले आहे. माजी सदस्यांच्या फलकांवर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड