पिंपरी : १४ वर्षांहून लहान वयाच्या बालगोविंदांना बंदी घालण्याची हमी राज्य सरकारने दिल्यानंतर उच्च न्यायालयाने दहीहंडीच्या थरांवरील २० फुटांच्या उंचीचे बंधनही मागे घेतले आहे. त्यामुळे आयोजकांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या संदर्भात पिंपरी-चिंचवड शहरातील प्रमुख दहीहंडी उत्सव आयोजकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या.न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे आम्ही स्वागतच करतो. या आदेशामुळे यंदाच्या दहीहंडी उत्सवात आणखीच रंगत येणार आहे. न्यायालयाने निर्बंध हटवले असले, तरी पथक आणि आयोजकांनी गोपाळांच्या सुरक्षेबाबत कोणतीही कसर सोडता कामा नये. सुरक्षेला प्राधान्य देऊन उत्सव साजरा करणार आहोत. तसेच शासनाकडून आलेले आदेशही पाळण्यात यावेत.त्यामुळे सणांचा उत्साह कायम राहील.दहीहंडीसारख्या पारंपरिक उत्सवावर कठोर निर्बंध असल्यामुळे तरुणांमध्ये नाराजी होती. मात्र, काल न्यायालयाने निर्बंध हटविल्यामुळे गोपाळ पथक आणि आयोजकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्या त्या आयोजकांनी आणि पथकांनी सुरक्षेबाबत सतर्क राहणे आवश्यक आहे. तसेच उत्सवादरम्यान काही अनुचित घडणार नाही, यासाठी तत्पर असणे गरजेचे आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर चैैतन्य निर्माण झाले असले, तरी सुरक्षेबाबत हयगय नको.न्यायालयाच्या आदेशाचे निश्चित स्वागत आहे. सुरक्षेबाबत पथकांनी आणि आयोजकांनी आपापल्या परिने काळजी घेणे अपेक्षित आहे. पथकांनी सुरक्षा साधनांबाबतही जागरूक राहावे. दहीहंडी उत्सवावेळी लाऊड स्पीकरच्या आवाजाबाबत काही बाबींची अद्याप स्पष्टता नाही. मात्र, न्यायालयाच्या आदेशानंतर यंदाच्या दहीहंडी उत्सवात चैैतन्य येणार हे नक्की आहे. - राजू मिसाळउच्च न्यायालयाने सोमवारी दहीहंडीवरील निर्बंध उठवले. या निर्णयाकडे मी सकारात्मक दृष्टिकोनातूनच पाहतो. मात्र, आयोजकांनी दहीहंडीच्या ठिकाणी सुरक्षेबाबत काळजी घेणे आवश्यक आहे. आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवल्या पाहिजेत. जेणेकरून काही अपघात झालाच, तर लगेच परिस्थिती नियंत्रणात आणता येईल. एकंदरीत आयोजक आणि पथकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. उत्सव साजरा करीत असताना तो निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी योग्य त्या उपाययोजना राबविण्यात यावे.थरांचे निर्बंध उठविल्याचा आनंदच आहे. परंपरागत सणांवर असे निर्बंध असूच नयेत. त्यामुळे तो साजरा करताना उत्साह मावळतो. मात्र, यंदा न्यायालयाच्या आदेशाने आनंदाचे वातावरण नक्क ी निर्माण होईल. शक्यतो गोविंदा पथकातील गोविंदा प्रशिक्षित असतात. त्यामुळे अपघाताची शक्यता नसते. क्वचित अपघात झालाच, तर आयोजकांनीही आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवावी. सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात. - संदीप कस्पटे
न्यायालय आदेशामुळे दहीहंडी आयोजकांमध्ये उत्साह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2017 3:54 AM