शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: "चार गोष्टी मनासारख्या होतील, चार विरुद्ध होतील"; फडणवीसांचा इच्छुकांना मेसेज
2
देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधी सोहळ्याची पत्रिका व्हायरल; बघा, त्यांच्यासोबत कोण-कोण घेणार शपथ?
3
'त्या' संघर्षातही आमदारांनी साथ सोडली नाही, आज इतिहास घडला - देवेंद्र फडणवीस
4
Devendra Fadnavis : नगरसेवक ते मुख्यमंत्री...अशी आहे देवेंद्र फडणवीस यांची झंझावाती राजकीय कारकीर्द!
5
डिफेन्स स्टॉक्सची मोठी झेप; ₹२१७७२ कोटींच्या अधिग्रहण प्रस्तांवाना मंजुरी; कोणते आहेत शेअर्स?
6
"आता मला लवकर लग्न करायचंय; ३ मुलांना जन्म द्यायचाय, जर दोन वर्षांत मुलगा..."
7
रशिया हल्ला करणार? युरोपमध्ये चाललीय तिसऱ्या विश्वयुद्धाची तयारी; जर्मन गुप्तचर संघटनेच्या दाव्याने खळबळ
8
मार्गशीर्षाचा पहिला गुरुवार: ७ राशींवर धनलक्ष्मी कृपा, लॉटरीतून लाभ; अपार यश, भरभराटीचा काळ!
9
"दिल्लीत येण्याआधी खूप विचार करतो कारण..."; गडकरींची राजधानीपासून दूर राहण्याला पसंती
10
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरला! भाजपा विधिमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड
11
"मी अशा राज्यातून येते, जिथे हिंदी शिकणं गुन्हा वाटतो"; निर्मला सीतारामन लोकसभेत भडकल्या
12
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मुंबई पोलिसांना मोठं यश; मनी ट्रेल, फंडिंगचे मिळाले पुरावे
13
महिंद्राच्या नवीन इलेक्ट्रिक कारवर बंदी येणार? इंडिगो एअरलाईन्सने खेचलं कोर्टात; काय आहे प्रकरण?
14
IndiGo चा समावेश सर्वात खराब एअरलाईन्सच्या यादीत; 'ही' आहे सर्वात चांगली विमान कंपनी
15
खेडेगावातील लेकीने रचला इतिहास; एकाच वेळी ३ सरकारी नोकऱ्या, आता IAS होण्याचं स्वप्न
16
मोबाइल सायबर हल्ल्यांमध्ये भारत आघाडीवर; २०० हून अधिक अ‍ॅप्स धोकादायक!
17
Pushpa 2 Review: अल्लू अर्जुन नव्हे तर 'या' कलाकाराने गाजवला 'पुष्पा 2'! सिनेमाचा पहिला रिव्ह्यू समोर
18
राहुल गांधींच्या संभल दौऱ्यावरून काँग्रेस-सपामध्ये मतभेद, रामगोपाल यादव म्हणाले...
19
मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्काराला हजेरी लावण्यासाठी अभिनेत्याला मिळाले पैसे, म्हणाला- "पांढरे कपडे घालून यायला सांगितलं आणि..."

सत्तेची गणिते जुळविण्यासाठी कसरत

By admin | Published: August 08, 2015 12:34 AM

मावळ तालुक्यात ४७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी झाली. आॅगस्टअखेर ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचपदाच्या निवडणुका होणार असल्याने

महादेव वाघमारे, वडगाव मावळमावळ तालुक्यात ४७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी झाली. आॅगस्टअखेर ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचपदाच्या निवडणुका होणार असल्याने ग्रामपंचायतीवर आपल्याच पक्षाची सत्ता आणण्यासाठी पक्षाचे राजकीय नेते ग्रामपंचायतीमध्ये बहुमत सिद्ध करण्यासाठी सदस्यांचे गणित जुळविण्यासाठी कसरत करत आहेत.निवडणुका गावकी व भावकीच्या जोरावर स्थानिक पॅनलच्या वतीने निवडणुका लढविल्या गेल्या. यात कोणत्याही उमेदवाराने राजकीय पक्षाच्या चिन्हावर ग्रामपंचायत निवडणुका लढविल्या नाही. तरी, पक्षाचे राजकीय नेते मावळ तालुक्यात आमच्या पक्षाचे उमेदवार सर्वाधिक निवडून आले आहेत. पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा व लोकसभा निवडणुका भवितव्य ग्रामपंचायतीवरील वर्चस्वावर असते. ग्रामपंचायतीवर सत्ता कायम राहण्यासाठी आजी-माजी सदस्यांनी आरक्षण जागेचा विचार करता त्यांच्याच घरातील उमेदवार निवडून आणले आहे. केवळ सरपंच व उपसरपंचपद मिळविण्यासाठी बहुमत सिद्ध करण्यासाठी माजी सदस्य व राजकीय नेते प्रत्येक सदस्याला पदाचे व पैशाचे आमिष दाखवून पाठिंबा मिळवत आहेत. काही ग्रामपंचायतींत सत्ता काबीज करण्यासाठी एकाच सदस्याची आवश्यकता आहे. अशा ग्रामपंचायतींच्या सदस्याला पद व मोठ्या रकमेचे आमिष दिले जात आहे. काही राजकीय नेत्यांनी अशा महत्त्वाच्या सदस्याला काबीज करून त्यांना अनाथ स्थळी ठेवल्याची चर्चा आहे. निवडणुकीच्या अगोदर २४ तास मोबाईल चालू ठेवणारे व मतदाराला सतत दर्शन देणाऱ्या उमेदवारांचे मतमोजणीनंतर फोन बंद असून, त्यांचा शोध मतदार घेत आहे. कुणबीच्या दाखल्याने ओबीसी जागांवर आजी-माजी सदस्यांच्या महिला व मुलांची बाजी असून, ५० टक्के महिलाराज व तरुणाईचा सहभाग वाढल्याने ग्रामपंचायती निवडणुकीत चैतन्य आल्याचे दिसत आहे. काही ठिकाणी घराणेशाही सुरू असल्याचे दिसत आहे.निवडणुकीत आश्वासन देणारे विजयी उमेदवार निवडणूक संपल्यावर ‘नॉट रिचेबल’ झाले आहेत. बहुमताचे गणित जुळविताना विजयी सदस्य मिळत नसल्याने त्या सदस्यांच्या नातेवाइकाच्या घरी राजकीय नेते चकरा मारत असून, तेथे नसल्याचे समजल्यास राजकीय नेते निराश होत आहेत. सत्ता आमची असल्याचा दावा करणाऱ्या काही नेत्यांच्या हातून सत्ता बहुमताचे गणित न जुळल्याने हातून निसटत आहेत. सरपंच व उपसरपंच निवडणुकीपर्यंत विजयी सदस्यांची मनधरणी करताना नेत्यांना कसरत करावी लागत आहे.विजयी सदस्याचा काही तास फोन बंद असल्यास नेते त्याच्या घरी पोहोचत आहेत. त्यास कोणी आमिष दाखवून परिवर्तन करणार नाही, यासाठी पाहिजे ती मदत करण्याचे आश्वासन देण्यात येत आहे.