शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
3
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
4
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
5
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
6
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
7
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
8
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
9
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
10
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
11
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
12
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
13
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
14
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
15
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
16
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
18
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
19
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
20
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...

उद्योगनगरीने अनुभवला पुणेरी इरसालपणा, तिरकस भाष्याला मिळाली मनमुराद दाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2018 1:38 AM

औद्योगिकनगरीतील नागरिकांच्या आग्रहास्तव लोकमत वृत्तपत्रसमूहाच्या वतीने पुणेरी पाट्या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. रविवारी पहिल्याच दिवशी प्रदर्शनास अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. अस्सल पुणेरी, खवचट व वात्रट पाट्यांचे प्रदर्शन सुरू झाले. पुणेरी स्पष्टवक्तेपणा, थेट भिडण्याची वृत्ती, इरसालपणा उद्योगनगरीने अनुभवला.

पिंपरी - औद्योगिकनगरीतील नागरिकांच्या आग्रहास्तव लोकमत वृत्तपत्रसमूहाच्या वतीने पुणेरी पाट्या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. रविवारी पहिल्याच दिवशी प्रदर्शनास अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. अस्सल पुणेरी, खवचट व वात्रट पाट्यांचे प्रदर्शन सुरू झाले. पुणेरी स्पष्टवक्तेपणा, थेट भिडण्याची वृत्ती, इरसालपणा उद्योगनगरीने अनुभवला.चिंचवड येथील गंधर्व हॉलमध्ये लोकमत आयोजित कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स प्रस्तुत पुणेरी पाट्यांचे प्रदर्शन आयोजित केले आहे. सकाळपासूनच पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांची प्रदर्शन पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. मेन्स अ‍ॅव्हेन्यूच्या सहयोगाने भरविलेले प्रदर्शन को-पॉवर्ड बाय शिवसेना गटनेते राहुल कलाटे व राणी पुतळाबाई वुमन्स लॉ कॉलेज आणि आईस्क्रीम पार्टनर खत्री बंधू पॉट आईस्क्रीम व मस्तानी आहे. आउटडोअर पार्टनर धीरेंद्र आउटडोअर मीडिया सोल्युशन्स प्रा. लि.,तर व्हेन्यू पार्टनर कर्तव्य फाउंडेशन आहे.प्रदर्शनाचे औपचारिक उद्घाटन सकाळी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते झाले. प्रारंभी लोकमतचे संस्थापक-संपादक, ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर दीपप्रज्वलन झाले. या वेळी राज्य लोकलेखा समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. सचिन पटवर्धन, शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे, बांधकाम व्यावसायिक आर. डी. देशपांडे, केआरए ज्वेलर्सचे अतुल आष्टीकर, आकाश शेळके, राणी पुतळाबाई वुमन्स लॉ कॉलेजचे प्रमुख अजय साळुंखे, मेन्स अ‍ॅव्हेन्यूचे अजित जैन, खत्री बंधू पॉट आईस्क्रीम मस्तानी संस्थेचे गिरीश खत्री, भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे उपस्थित होते.उद्योगनगरीमध्ये प्रथमच झालेल्या पुणेरी पाट्या प्रदर्शनास उदंड प्रतिसाद मिळाला. हा उपक्रम स्तुत्य आहे.- अतुल आष्टेकर, केआरए ज्वेलर्सपुणेरी पाट्या प्रदर्शनातून उद्योगनगरीतील नागरिकांना पुणेरी संस्कृतीचे दर्शन घडले.- अजिंक्य बडवे, मेन्स अ‍ॅव्हेन्यूलोकमतच्या या प्रदर्शनातून पुणेरी अभिमानाचे दर्शन घडले. प्रदर्शनास चांगला प्रतिसाद मिळाला. - अजय साळुंखे, राणी पुतळाबाई वुमन्स लॉ कॉलेजपिंपरी-चिंचवडमध्ये लोकमतने आयोजित केलेल्या पुणेरी पाट्यांचा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. - गिरीश खत्री, खत्री बंधू पॉट आईस्क्रीम४आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी एक किस्सा सांगितला. ते म्हणाले, ‘‘आमच्या घरात एका खोलीतील दरवाजा हा कमी उंचीचा होता. त्याचे कारण म्हणजे एक सिमेंटचा बीम आला होता. त्यामुळे वडिलांनी त्या ठिकाणी कोणाचे डोके आपटून इजा होऊ नये, म्हणून तिथे मोठ्या अक्षरात लिहिले होते - डोके असेल तर वाका.’’ आयुक्तांच्या या वाक्यावर हास्यलाट उसळली.पुणेरी पाटी आणि संस्कृती सर्वत्र प्रसिद्ध आहे. निखळ आनंद देणाऱ्या या पुणेरी पाट्या असून, विनोदी वृत्ती आणि मार्मिकपणा लक्षात येतो. पिंपरी-चिंचवडकरही पाट्यांमध्ये कमी नाहीत. त्याचेही एक प्रदर्शन होऊ शकते. लोकमतने पुणेरी पाट्यांचे प्रदर्शन भरवून इरसाल संस्कृतीचे दर्शन घडविले. त्याबद्दल लोकमतला धन्यवाद. - श्रावण हर्डीकर, आयुक्त, महापालिकानिखळ आनंद देणाºया, खोचकपणे डोळ्यांत अंजन घालणाºया पुणेरी पाट्या असून, पिंपरी-चिंचवडकरांना पुणेरी संस्कृतीचा अनुभव दिल्याबद्दल धन्यवाद.- अ‍ॅड. सचिन पटवर्धन,अध्यक्ष, लोकलेखा समितीपुणेरी पाट्या जगाभरामध्ये प्रसिद्ध आहेत. अशा पुणेरी संस्कृतीचे दर्शन लोकमतने घडविले. या प्रदर्शनाचा आस्वाद शहरवासीयांनी घ्यावा.- राहुल कलाटे,गटनेते, शिवसेना 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड