शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
2
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
3
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
4
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
5
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
6
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
7
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
8
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
9
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
10
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
11
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
12
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
13
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
15
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
16
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
17
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
18
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
19
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!
20
अमेरिकेत संक्रमित गाजर खाल्ल्याने एका व्यक्तीचा मृत्यू, अनेक जण आजारी; १८ राज्यांमधून परत मागवले

निविदा प्रक्रिया रखडल्याने सफाईला मुदतवाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2019 2:51 AM

शहरातील रस्त्यांची रोडस्वीपर वाहनांद्वारे साफसफाई करण्यासाठी नेमलेल्या दोन ठेकेदारांवर महापालिका प्रशासन मेहेरबान आहे.

पिंपरी : शहरातील रस्त्यांची रोडस्वीपर वाहनांद्वारे साफसफाई करण्यासाठी नेमलेल्या दोन ठेकेदारांवर महापालिका प्रशासन मेहेरबान आहे. कामाची मुदत संपली असताना नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्यासाठी काही कालावधी जाणार असल्याचे कारण देत या दोन्ही ठेकेदारांना वेळोवेळी मुदतवाढ दिली जात आहे. चार महिन्यांसाठी त्यांच्यावर १ कोटी ४० लाख रुपये खर्च होणार आहेत.शहरातील रस्त्यांची सफाई यांत्रिक पद्धतीने रोडस्वीपर वाहनाद्वारे करण्यात येते. केंद्राच्या जेएनएनयुआरएम योजनेंतर्गत घनकचरा व्यवस्थापनासाठी सरकारकडील मंजूर निधीतून ही स्वच्छता केली जाते. महापालिका मालकीची आठ वाहने आणि ठेकेदार मालकीची दोन अशा दहा रोडस्वीपर वाहनांद्वारे शहरातील रस्त्यांची दैनंदिन साफसफाई केली जाते. ही दहाही वाहने वेगवेगळ्या क्षमतेची आहेत. या कामासाठी महापालिकेने डी. एम. एंटरप्रायजेस आणि बीव्हीजी इंडिया या ठेकेदारांची नेमणूक केली आहे. त्यांना चार कामांसाठी वाहनांच्या क्षमतेनुसार वेगवेगळे दर ठरवून दिले आहेत. डी. एम. एंटरप्रायजेस हे महापालिका मालकीच्या सहा वाहनांमार्फत रस्त्यांची तसेच पुणे-मुंबई महामार्गाची साफसफाई करतात. त्यांना ४० किलोमीटर कामासाठी प्रति किलोमीटर प्रति दिन २१९ रुपये दर ठरविण्यात आला आहे. तर बीव्हीजी इंडिया हे महापालिका मालकीची चार वाहने आणि त्यांच्या स्वत:च्या मालकीच्या दोन वाहनांद्वारे रस्त्यांची साफसफाई करतात. त्यांना या कामांसाठी अनुक्रमे २७१ रुपये आणि २९८ रुपये प्रति किलोमीटर प्रति दिन दर ठरविला आहे.>प्रशासनाचे दुर्लक्ष : मुदतवाढ देण्यामागे आर्थिक हितसंबंधया ठेकेदारांना दोन वर्षे कालावधीसाठी दिलेल्या कामाची मुदत ३० नोव्हेंबर २०१७ रोजी संपली. त्यानंतर त्यांना वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली. अखेरची मुदतवाढ त्यांना २३ आॅक्टोबर २०१८ रोजी देण्यात आली होती. आता ही मुदतवाढही ३१ डिसेंबर २०१८ रोजी संपुष्टात आली. नवीन निविदा प्रक्रियेसाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय रोडस्वीपर वाहनांची आवश्यक संख्या तसेच रूटचार्ट आदी आवश्यक माहिती सध्या मागविण्यात येत आहे. ही निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष काम सुरू होण्यासाठी काही कालावधी जाणार आहे. त्यामुळे या ठेकेदारांना ठरवून दिलेल्या दरानुसार, १ जानेवारी २०१९ ते ३० एप्रिल २०१९ या चार महिने कालावधीसाठी मुदतवाढ देण्यात येणार आहे. त्यासाठी १ कोटी ४० लाख रुपये खर्च होणार आहेत.