पिंपरी : सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरीला लावण्याच्या आमिषाने तरुणाच्या वडिलांकडून पाच लाख रुपये घेतले. मात्र, त्यानंतर नोकरी न लावता पैशांचा अपहार करत फसवणूक केली. ही घटना फेब्रुवारी ते ऑगस्ट २०२१ या कालावधीत तळेगाव येथे घडली.
याप्रकरणी प्रमोद पंढरीनाथ चौधरी (वय ६४, रा. तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, कैलास विश्वनाथ भालेराव (३६, रा. तळेगाव दाभाडे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भालेरावने चौधरी यांचा विश्वास संपादन करून त्यांचा मुलगा नीलेश चौधरी याला सार्वजनिक बांधकाम विभागात कामाला लावतो असे सांगितले. त्यासाठी चौधरी यांच्याकडून फेब्रुवारी ते ऑगस्ट २०२१ या कालावधीत ५ लाख ७ हजार रुपये घेतले. पैसे घेऊन नोकरीला लावले नाही. तसेच, वारंवार पैसे मागूनदेखील त्यांना त्यांचे पैसे परत न देता अपहार केला.