शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब... काय तो स्टॅमिना! धड झोप नाही, खाण्याची वेळ नाही, प्रचारादरम्यान, नेतेमंडळी कोणती काळजी घेतात?
2
थंडीविना केवळ १९ टक्के क्षेत्रावरच रब्बीच्या पेरण्या, ज्वारी ३४ टक्के, हरभरा १७, गव्हाचा केवळ ४ टक्के पेरा पूर्ण
3
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
4
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
5
कॅप्टन सूर्याकडून तो खास मेसेज मिळाला अन् संजू चमकला!
6
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
7
IND vs SA : लांब सिक्सर मारणाऱ्यापेक्षा रस्त्यावर पडलेला मॅच बॉल लांबवणाऱ्याची चर्चा (VIDEO)
8
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
9
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
10
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
11
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
13
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
14
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
15
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
17
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
18
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
19
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
20
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा

हद्दवाढीमुळे सुविधांवर ताण

By admin | Published: May 21, 2017 4:00 AM

ग्रामपंचायतींचे विलीनीकरण करून नगरपालिका, महापालिका असा विस्तार झालेल्या महापालिकेत दुसऱ्यांदा मोठी हद्दवाढ प्रस्तावित आहे. त्यामध्ये आयटी

- लोकमत न्यूज नेटवर्क

पिंपरी : ग्रामपंचायतींचे विलीनीकरण करून नगरपालिका, महापालिका असा विस्तार झालेल्या महापालिकेत दुसऱ्यांदा मोठी हद्दवाढ प्रस्तावित आहे. त्यामध्ये आयटी क्षेत्र विकसित झालेली हिंजवडी, औद्योगिकीकरणाचा विस्तार झालेले चाकण तसेच देहू, आळंदी तीर्थक्षेत्र यासह आजूबाजूच्या २० गावांचा समावेश होणार आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये वाढत्या नागरिकरणाची गरज लक्षात घेऊन गृहप्रकल्प साकारले जात असले तरी त्या तुलनेत सुविधा मात्र उपलब्ध होत नसल्याची खंत नागरिक व्यक्त करू लागले आहेत. मोशी, चिखली, रावेत, किवळे, पुनावळे या हद्दवाढीच्या भागात आलिशान गृहप्रकल्प साकारले तरी पाणीपुरवठा मात्र टँकरने केला जात असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, भोसरी या चार ग्रामपंचायतींचे विलीनीकरण करून १९७० मध्ये नगरपालिकेत नंतर १० आॅक्टोबर १९८२ ला महापालिकेत रूपांतर झालेल्या या शहराने गाव ते महानगरापर्यंतचा प्रवास केला आहे. या महानगरात चाकण आणि हिंजवडी परिसरातील आणखी २० गावांचा समावेश होणार असल्याने दुप्पटीने भौगोलिक विस्तार होणार आहे. परिणामी नागरीकरणही प्रचंड वाढणार आहे. औद्योगिकनगरी म्हणून या शहराने ओळख निर्माण केली आहे. छोटे मोठे सुमारे ६ हजार कारखाने या भागात आहेत. आजूबाजूची गावे विकासापासून वंचितपहिल्या हद्दवाढीत १८ गावे समाविष्ट महापालिकेचा विस्तार होत असताना भौगोलिक मर्यादा येऊ लागल्या. पालिका क्षेत्राचा विकास होत असताना आजूबाजूची गावे विकासापासून वंचित राहिली. त्यामुळे शासनाने ११ सप्टेंबर १९९७ ला १८ गावांचा पालिका हद्दीत समावेश केला. त्यामध्ये तळवडे, चिखली, मोशी, डुडुळगाव, वडमुखवाडी, दिघी, दापोडी, भोसरी, सांगवी (उर्वरित), पिंपळे निलख, वाकड, पुनावळे, किवळे, मामुर्डी, चोविसावाडी, चऱ्होली, बोपखेल, रावेत आदी गावांचा समावेश आहे. त्यांनतर ३० जुलै २०० ९ ला ताथवडे गावाचा महापालिकेत समावेश झाला आहे. समाविष्ट गावांत अनधिकृत बांधकामे दुसरी हद्दवाढ २० गावांची प्रस्तावित आहे. मात्र, पहिल्या हद्दवाढीस १६ वर्षे पूर्ण झाल्यानंतर दुसरी हद्दवाढ करण्याचे प्रस्तावित केली आहे. पहिल्या हद्दवाढीत १८ गावे तर आता २० गावे समाविष्ट करण्याचे नियोजन आहे. प्रस्तावित हद्दवाढीच्या भागात मोठ्या प्रमाणावर बांधकामे सुरू असून सुविधांवर ताण येऊ लागला आहे. बांधकामांना परवानगी देताना सुविधांवर येणारा ताण विचारात घेऊन सुविधा देणे अपेक्षित आहे. नागरीकरणाचा वेग ७२ टक्के पिंपरी-चिंचवडचे एकूण क्षेत्रफळ १७७ चौरसमीटर इतके आहे. १९८२ प्रमाणे जुनी हद्द ८६ चौरस किलोमीटर होती. १९९७ मध्ये १८ गावांचा महापालिकेमध्ये समावेश करण्यात आला. ८४.५१ चौरसकिलोमीटरने हद्दवाढ झाली. ३० जुलै २००९ ला ताथवडे गावाचा महापालिकेत समावेश करण्यात आला. ते ६.४९ चौरस किलोमीटर क्षेत्र मिळून एकूण भौगोलिक क्षेत्र १७७ चौरसकिलोमीटर झाले. २०११ च्या जनगननेनुसार १७ लाख २९ हजार इतकी आहे. बाहेरून येऊन शहरात स्थायिक होणाऱ्या स्थलांतरांचे प्रमाण ७२ टक्के आहे. राज्यातील अन्य शहरांच्या तुलनेत या शहराचा स्थलांतराचा वेग अधिक आहे. नागरिकरणाच्या वेगाच्या तुलनेत सुविधांच्या पुर्ततेचा वेग वाढला पाहिजे, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत. केवळ २५ टक्के आरक्षणे विकसितविकास आराखड्यात ११६१.८२ हेक्टर क्षेत्रावर ११५० आरक्षणे टाकण्यात आली आहेत. त्यापैकी २९९.७७ हेक्टर जागा महापालिकेच्या ताब्यात आहे. उर्वरित ८६२.५ हेक्टर जागेचा अद्याप ताबा मिळालेला नाही. १९९७ ला महापालिका हद्दीत १७ गावे समाविष्ट होऊन २० वर्षाच्या कालावधीत केवळ २५ टक्के आरक्षणे विकसित झाली आहेत. समाविष्ट गावे विकासापासून अद्यापही वंचित राहिली आहेत. महापालिकेने नोव्हेंबर १९९५ मध्ये विकास आराखडा तयार केला. २००९ मध्ये आराखड्याला अंशत: मंजुरी मिळाली. २० वर्षांपूर्वी महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या तळवडे, चिखली, मोशी, डुडुळगाव, वडमुखवाडी, दिघी, दापोडी,भोसरी, सांगवी, पिंपळे निलख, वाकड, पुनवळे, किवळे, मामुर्डी, चोविसावाडी, चऱ्होली, बोपखेल या गावांमध्ये शाळा, दवाखाने, उद्याने अशी महत्त्वाच्या प्रकल्पाची सर्व आरक्षणे अद्याप विकसित झालेली नाहीत. केवळ रस्ते, जलवाहिन्या आणि विद्युत विषयक मूलभूत सुविधांची कामे झाली आहेत.