पिंपरी : महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांना रविवार, दि. २९ जानेवारीलाही उमेदवारीअर्ज भरता येणार आहे. आॅनलाइन उमेदवारीअर्ज भरायचा असल्याने अडचण येऊ नये, यासाठी ही सोय उपलब्ध करून दिल्याचे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक २१ फेब्रुवारीला होणार आहे. त्यासाठी २७ जानेवारी ते ३ फेब्रुवारी या कालावधीत उमेदवारीअर्ज भरण्याची मुदत आहे. रविवारी सरकारी कार्यालयांना सुटी असल्याने उमेदवारीअर्ज स्वीकारण्यात येणार नव्हते. मुंबई महापालिका वगळता इतर महापालिकांसाठी बहुसदस्यीय पद्धतीने निवडणूक होणार आहे. एका प्रभागातून चार सदस्य निवडून येणार आहेत. यंदा प्रथमच उमेदवारीअर्ज व त्यासोबत सादर करण्यात येणारी शपथपत्रे आॅनलाइन भरावी लागणार आहेत. उमेदवारांना उमेदवारीअर्ज व शपथपत्र भरण्यात अडचण येऊ नये, याकरिता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मदत कक्षाची स्थापना करावी. सायबर कॅफे, नागरी सुविधा केंद्रांची मदत घ्यावी, राजकीय पक्षाच्या लोकांना प्रशिक्षण द्यावे, अशा सूचना निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. (प्रतिनिधी)
अर्ज भरण्याची रविवारीही सुविधा
By admin | Published: January 26, 2017 12:27 AM