शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
4
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
5
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
7
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
8
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
9
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
10
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
11
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
12
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
13
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
14
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
15
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
16
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
17
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
18
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
19
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
20
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई

‘त्यांना’ समस्या सोडवावी लागणे हे नोकरशाहीचे अपयश - महेश झगडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 2:28 AM

नळ जोडणी करणे,गटारे साफ करणे, रस्त्याची दुरूस्ती करणे आदी कामे करून नागरिकांच्या समस्या सोडविण्याची जबाबदारी प्रशासकीय अधिका-यांची आहे. मात्र, अधिकारी या कामांकडे दुर्लक्ष करत असल्याने या प्रकारची विविध कामे खासदार, आमदार, नगरसेवक या लोकप्रतिनिधींना करावी लागत आहेत.

पुणे - नळ जोडणी करणे,गटारे साफ करणे, रस्त्याची दुरूस्ती करणे आदी कामे करून नागरिकांच्या समस्या सोडविण्याची जबाबदारी प्रशासकीय अधिका-यांची आहे. मात्र, अधिकारी या कामांकडे दुर्लक्ष करत असल्याने या प्रकारची विविध कामे खासदार, आमदार, नगरसेवक या लोकप्रतिनिधींना करावी लागत आहेत. मात्र, हे नोकरशाहीचे अपयश आहे, अशी खंत माजी सनदी अधिकारी महेश झगडे यांनी मंगळवारी व्यक्त केली.अमृतवेल फाउंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘गव्हर्नन्स संवाद अभियान’ कार्यक्रमात झगडे बोलत होते. यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष धर्मेंद्र पवार उपस्थित होते.ते म्हणाले, की कायदे तयार करणे, धोरण आखणे, अंदाजपत्रकात तरतूद करणे ही लोकप्रतिनिधींची कामे असून या कामांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी नोकरशाहीची आहे. मात्र, काही अधिकारी गेंड्याच्या कातडीचे आहेत.त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.संसद, विधिमंडळाने तयार केलेले कायदे, योजनांची शंभर टक्के अंमलबजावणी होते की नाही, याचे लेखापरीक्षण झाले पाहिजे.शासनाने माहितीचा अधिकार, झिरो पेन्डन्सी, सेवा हमी असे अनेक कायदे आणले. मात्र, केवळ कायदे केल्यामुळे प्रश्न सुटत नाहीत. तर नोकरशाहीकडून कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे.तसेच प्रशासनातील शेवटच्या स्तरावरील यंत्रणेच्या कामावर लक्ष देण्याची गरज आहे. सध्या माहिती अधिकाराची सुमारे ३७ हजार प्रकरणे प्रलंबित आहेत.प्रशासनात पारदर्शकता असेल तर माहिती अधिकार कायद्याची गरजच भासणार नाही. प्रशासन सक्षम नसल्याने त्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.शहर नियोजन हा माझा आवडीचा विषय असल्याने मी पीएमआरडीएचा पदभार स्वीकारून विकास कामांना सुरूवात केली. बांधकाम परवाने आॅनलाइन देण्यासाठी व्हर्च्युअल आॅफिससह रोजगारनिर्मिती, स्थानिक लोकांच्या अर्थार्जनाच्या दृष्टीने मेगा सिटीचा रोडमॅप यावर भर दिला.मात्र, जसे माझे स्वप्न होते, तशा पद्धतीने सध्या काम होताना दिसत नाही. कदाचित भविष्यात ही कामे केली जातील.पालकमंत्र्यांना समजावून सांगण्यात कमी पडलोपीएमआरडीएतून झालेल्या बदलीबाबत बोलताना झगडे म्हणाले, ‘पालकमंत्री गिरीश बापट आणि माझे चांगले संबंध होते. मात्र, त्यांचे, माझे विचार वेगळे असल्याने काही ठिकाणी मतभिन्नता असू शकते, कदाचित त्यांना समजावून सांगण्यात मी कमी पडलो.तसेच निवृत्तीनंतर 'राजकारणात जाणार नाही,परंतु,माझ्या ज्ञानाचा व अनुभवाचा समाजाला फायदा करून देण्यासाठी कार्यरत राहणार आहे.केंद्र शासनाने यूपीएससीची परीक्षा न देता खासगी कंपन्यातील अधिका-यांना थेट सहसचिवपदी नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.मात्र,या निर्णयावर चर्चा होण्याची गरज आहे. खासगी क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींच्या ज्ञानाचा उपयोग प्रशासनात झाला पाहिजे. परंतु, त्यांचीही निवड यूपीएससीद्वारे होणार का?, संबंधित अधिकारी प्रशासनाशी एकनिष्ठ राहणार आहेत का? अशा अनेक शंका आहेत. त्यामुळे या निर्णयाचे विश्लेषण झाले पाहिजे, असे महेश झगडे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाnewsबातम्या