शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

सावधान! फसवणुकीसाठी तयार केले जातेय पोलीस अधिकाऱ्यांचेच बनावट अकाऊंट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2020 5:33 PM

सायबर चोरट्यांकडून सोशल मीडियाचा वापर

ठळक मुद्देगेल्यावर्षी ३००८ तर यंदा जानेवारी ते नोव्हेंबर या ११ महिन्यांमध्ये ३५८१ तक्रार अर्जवर्षभरात साडेतीन हजार तक्रार अर्ज

नारायण बडगुजर-पिंपरी : पोलीस आयुक्त, तसेच पोलीस अधिकारी यांच्या नावने फेसबुकचे अकाऊंट किंवा पेज तयार करून त्यावरून पैशांची मागणी होत असल्याचे प्रकार समोर आले. त्यामुळे सायबर चोरट्यांचे धाडस वाढल्याचे दिसून येते. अशा पद्धतीने ऑनलाईन फसवणूक तसेच सायबर क्राईमचे प्रकार सध्या वाढले आहेत. शहरातील नागरिकांनी गेल्यावर्षी ३००८ तर यंदा जानेवारी ते नोव्हेंबर या ११ महिन्यांमध्ये ३५८१ तक्रार अर्ज सायबर सेलकडे दाखल केले आहेत.

हिंजवडी-माण माहिती तंत्रज्ञान (आयटी) पार्क तसेच तळवडे साॅफ्टवेअर पार्कमुळे पिंपरी-चिंचवड शहराचे नाव देश-परदेशात पोहचले. संगणकतज्ज्ञांसह लाखो आयटीयन्स शहरात वास्तव्यास आले. तसेच मोबाईल फोनचे वापरकर्ते शहरात तुलनेने जास्त आहेत. त्यांना ‘टार्गेट’ करण्याचा ‘उद्योग’ सायबर गुन्हेगारांकडून होत आहे. कोरोनाकाळात सायबर क्राईमचे प्रमाण वाढले. त्यात ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार सर्वाधिक आहेत. सामान्य नागरिकांप्रमाणेच उच्चशिक्षित तसेच आयटी पार्कमधील कर्मचाऱ्यांना ऑनलाईन गंडा घातला जात आहे. विविध वस्तू खरेदी-विक्रीचा बहाणा तसेच भावनिक मुद्दा पुढे करून तसेच कर्ज देण्याच्या आमिषाने देखील फसवणूक केली जात आहे. 

..............असा घातला जातोय गंडाबॅंकेतून बोलत असून, तुमचे एटीएम कार्ड, पेटीएम खाते अपडेट करायचे आहे, असे सांगून संबंधितांच्या बॅंक खात्यातील पैशांवर डल्ला मारला जात आहे. तसेच व्हाॅटसअप हॅक करून देखील तसेच व्हाॅटसअपवरून ओळख करून पैशांची मागणी केली जात आहे. बक्षीस लागले आहे, तुम्हाला बोनस देण्यात येत आहे, असे मेसेज करून देखील पैशांची मागणी करून फसवणूक केली जाते.  

.........................

दोन वर्षांत ४१७ तक्रारींचा निपटारापिंपरी-चिंचवडपोलिसांच्या सायबर सेलकडे थेट तसेच ऑनलाईन पद्धतीने तक्रारदारांकडून अर्ज केले जातात. यंदा जानेवारी ते नाेव्हेंबर या ११ महिन्यांत १२५० थेट तर २३३१ अर्ज ऑनलाईन असे एकूण ३५८१ तक्रार अर्ज यंदा दाखल झाले. यातील १०८ अर्जांचा निपटारा करण्यात आला. तर ९९५ तक्रार अर्ज संबंधित पोलीस ठाण्यांकडे देण्यात आले. त्याचप्रमाणे २०१९ मध्ये दाखल झालेल्या ३००८ तक्रार अर्जांपैकी ३०९ अर्जांचा निपटारा सायबर सेलने केला तर २६९९ अर्ज पोलीस ठाण्यांकडे वर्ग करण्यात आले. सायबर सेलने दोन वर्षांत ४१७ तक्रार अर्जांचा निपटारा केला.

..............फेसबुक, व्हाटसअप अशा सोशल मीडियावरून पैशांची मागणी होत असल्यास संबंधित व्यक्तीशी थेट बोलणे करावे, पैसे ऑनलाईन ट्रान्सफर करण्यापूर्वी संबंधित व्यक्तीचे बॅंक खाते, मोबाईल फोन नंबर आदी बाबतीत खात्री करून घ्यावी. तसेच बोनस, बक्षीस, कमी व्याजाचे कर्ज अशा पद्धतीने कोणत्याही आमिषाला बळी न पडता अशा प्रकारांत कोणत्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार करू नये. सोशल मीडियावरील अनोळखी व्यक्तींची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नये, तसेच अधिक सुरक्षेच्या दृष्टीने आपल्या अकाऊंटची सेटींग करावी. - प्रेरणा कट्टे, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिसfraudधोकेबाजीcyber crimeसायबर क्राइम