शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस कोल्हापुरात कुकर चिन्हावर लढणार? राजू लाटकर यांचे चिन्ह जाहीर, उद्या पुढची दिशा ठरणार...
2
Satej Patil: सतेज पाटलांच्या डोळ्यांत अश्रू तरळले; "दुपारी २.३६ मिनिटांनी मालोजीराजेंचा फोन आला"
3
अटकेपार झेंडे फडकावले आमच्या मराठे शाहीने अन् इथे व्यासपीठावर मुली नाचवतायत? राज ठाकरे कुणावर संतापले?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी नॉट रिचेबल नव्हतो, सतेज पाटीलच..."; मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर राजेश लाटकरांनी थेटच सांगितलं
5
कोलकाता बलात्कार प्रकरणी ८७ दिवसांनी आरोप निश्चित,दररोज सुनावणी होणार
6
धक्कादायक! मावशी गंगा स्नानाची रील बनवत राहिली अन् 4 वर्षांची चिमुकली बुडत रहिली! 2 तासांनंतर सापडला मृतदेह 
7
...तर रोहित कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होईल, केवळ एकदिवसीय सामने खेळेल; दिग्गज क्रिकेटरची मोठी भविष्यवाणी
8
कॅनडामध्ये हिंदू मंदिरावरावरील हल्ल्याचा मोदींकडून निषेध; 'ट्रुडोंनी कायद्याचे राज्य राखावे अशी अपेक्षा' 
9
AUS vs PAK : "ऑस्ट्रेलियाला नशिबाने साथ दिली...", पाकिस्तानच्या पराभवानंतर कर्णधार रिझवानचं विधान
10
सात राज्यांत कांटे की टक्कर, एकात ट्रम्प आघाडीवर; अमेरिकेच्या मतदानावर जगाच्या नजरा खिळल्या
11
video: लाईव्ह सामन्यादरम्यान कोसळली वीज; एका खेळाडूचा मृत्यू, तर अनेकजण गंभीर जखमी
12
त्याला १२ भाऊ आणि ४ बहिणी आहेत; पाकिस्तानी खेळाडूचा परिचय करुन देताना अक्रम भलतंच बोलला
13
दापोलीत सहा कदम, पर्वतीत तीन अश्विनी कदम! नावं, आडनावं 'सेम टू सेम', कुणाचा होणार 'गेम'
14
उपमुख्यमंत्री बनवून भाजपानं अन्याय केला का?; देवेंद्र फडणवीसांनी आभारच मानले, कारण...
15
राज ठाकरेंचा पहिला घणाघात; पक्ष फोडीवरून एकनाथ शिंदे-अजित पवारांवर बरसले
16
सदा सरवणकरांचा प्रचार करणार की अमित ठाकरेंचा? नारायण राणे म्हणाले...
17
"...तर मीही मुख्यमंत्री व्हायला तयार"; CM महायुतीचाच होणार म्हणत, रामदास आठवले बोलून गेले 'मन की बात'!
18
...तर उद्धव ठाकरे ५ वर्षांसाठी मुख्यमंत्री झाले असते; देवेंद्र फडणवीसांनी मांडलं समीकरण
19
सतेज पाटील भडकण्यापूर्वी कोल्हापुरात मोठे नाट्य घडले, शाहू महाराजांनीच मधुरिमाराजेंना सहीचे आदेश दिले
20
Sanjay Roy : "मी निर्दोष आहे, मला फसवण्यात आलं"; आरोपी संजय रॉयने सरकारवर केला गंभीर आरोप

पाणी परवाना देण्यासाठी ९० हजार रुपयांची लाच घेताना पवना पाटबंधारे कार्यालयातील महिला लिपिकास अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2021 5:50 PM

तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.....

वडगाव मावळ : पवना नदीपात्रातुन शेतीला पाणी पुरवठा परवानगी मिळवून देण्यासाठी तळेगाव येथील पवना पाटबंधारे कार्यालयाच्या  महिला लिपिकाने १,२०,००० रुपयाच्या लाचेची मागणी केली होती. मंगळवारी (दि.६) ९० हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना रंगेहाथ अटक केली आहे.

पवनानगर जलसिंचन विभागाच्या सहायक अभियंता मोनिका रामदास ननावरे (वय ३१, रा. तळेगाव दाभाडे ता. मावळ) असे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे पथकाने अटक केलेल्या महिला लिपिकाचे नाव आहे. 

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांना करंजगाव येथील शेतीला पवना नदीपात्रातून पाणी परवाना घेण्यासाठी तळेगाव दाभाडे येथील पवना पाटबंधारे विभागाचे कार्यालयात वारंवार जात होते.पाणी परवाना मिळवुन देण्यासाठी लिपिक मोनिका ननावरे यांनी तक्रारदार यांच्याकडे १,लाख २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडी करून ९० हजार देण्याचे ठरले. तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयात तक्रार केली.

पोलीस निरीक्षक अलका सरग, पोलीस निरीक्षक शरद गोर्डे,पोलीस निरीक्षक  सुनिल बिले,पोलीस हवालदार टिळेकर,पोलीस नाईक  वैभव गोसावी ,चालक पोलीस हवालदार. प्रशांत वाळके या पथकाने सापळा रचून आरोपी लिपिक मोनिका ननावरे यांना ९० हजार रुपयांची लाच घेताना यांना रंगेहाथ अटक केली आहे. या संदर्भात तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Vadgaon Mavalवडगाव मावळAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागBribe Caseलाच प्रकरणPoliceपोलिसArrestअटकWomenमहिला