शहरं
Join us  
Trending Stories
1
सदस्य नोंदणीत टार्गेट अपूर्ण, भाजपा नेतृत्व नाराज; पक्षातील नेत्यांची कानउघडणी
2
Babita Phogat : विनेशच्या राजकारणावर नाही तर 'या' गोष्टीमुळे महावीर फोगाट नाराज, बबिताने सांगितलं मोठं कारण
3
"मी जिंकेल याची 100 टक्के खात्री नव्हती", सुप्रिया सुळेंचं निवडणुकीबद्दल विधान
4
हत्येचा आरोप अन् सुरक्षा! शाकिबच्या अडचणी वाढल्या; बांगलादेश क्रिकेट बोर्डानं स्पष्टच सांगितलं
5
आयफोन बनवणाऱ्या टाटा इलेक्ट्रॉनिक कंपनीत भीषण आग; १५०० कामगारांना काढलं बाहेर
6
देश सोडला, भारतात आली, ओळख लपवली...; एडल्ट स्टार बन्ना शेख कशी बनली रिया बर्डे?
7
'डॉली चायवाला'ची क्रेझ! भारताच्या हॉकी संघाकडे केलं दुर्लक्ष; खेळाडूंनी व्यक्त केली खदखद
8
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका
9
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
10
अत्याचारी राक्षस पुन्हा नको, यासाठी माझी लढाई; उमेश पाटील करणार NCP ला रामराम?
11
Musheer Khan Accident: टीम इंडियाचा क्रिकेटर सर्फराज खानचा भाऊ मुशीरचा अपघात
12
Solar Eclipse 2024: सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही पण परिणाम होतो हे नक्की; जाणून घ्या उपाय!
13
पितृपक्ष: चतुर्दशी श्राद्ध एवढे महत्त्वाचे का? केवळ ‘या’ पितरांचा करतात विधी; पाहा, मान्यता
14
काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यांशी चकमक; 3 जवान जखमी, सर्च ऑपरेशन सुरू
15
Indira Ekadashi 2024: नोकरी व्यवसायात यशप्राप्तीसाठी आज इंदिरा एकादशीला करा 'हे' खास उपाय!
16
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
17
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
18
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
19
अदानींच्या झोळीत आली आणखी एक कंपनी; २०० कोटींना झाली डील, जाणून घ्या
20
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...

म्हाळुंगे गावात महिलेचा खून

By admin | Published: July 04, 2017 3:51 AM

घरात गेलेले शेजाऱ्याचे मांजर बाहेर फेकल्याच्या वादातून झालेल्या भांडणात लाकडी दांडक्याने महिलेला मारहाण करण्यात आली. त्यात

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : घरात गेलेले शेजाऱ्याचे मांजर बाहेर फेकल्याच्या वादातून झालेल्या भांडणात लाकडी दांडक्याने महिलेला मारहाण करण्यात आली. त्यात तिचा मृत्यू झाला. ही घटना म्हाळुंगे (मुळशी) येथे रविवारी रात्री घडली. पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. प्रभा मोहन रंगपिसे (वय ४०, रा. सुहास पाडाळे चाळ, म्हाळुंगे, पुणे) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रभा यांचा मुलगा अजय मोहन रंगपिसे (वय २७) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. अमोल संदीपान बालगुडे, गणेश उर्फ भैया श्रीमंत पाटील, आकाश राजेश मोंडे, राजू नंदकिशोर साळवे (रा.सर्व सुहास पाडाळे चाळ, म्हाळुंगे, पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या मारहाणीत फिर्यादीचा भाऊ हृषिकेश रंगपिसे (वय १७), तसेच मेहुणे दादू भाऊसाहेब खलसे (वय ४६) हे जखमी झाले आहेत.फिर्यादी अजय यांची बहीण सारिका खलसे यांचे मांजर शेजारीच राहणाऱ्या राजू साळवे यांच्या घरात गेले. त्यांनी ते मांजर रागाने बाहेर फेकले. याबाबत फिर्यादी यांचे मेहुणे दादू खलसे त्यांना जाब विचारण्यासाठी गेले असता, त्यांच्यात बाचाबाची झाली. त्याचे पर्यावसान हाणामारीत झाले. राजू साळवे याच्यासह अन्य आरोपींनी फिर्यादीचा मेहुणा, भाऊ व आईला मारहाण केली. प्रभा यांच्या डोक्यात व पाठीत लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्यात जबर जखमी झाल्याने प्रभा यांचा मृत्यू झाला. आरोपींना अटक करण्यात आली आहे.