पिंपरी : बोगस जामीनदार देऊन शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी सात जणांवर एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. दोन दिवसांपूर्वी बोगस जामीनदार प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. विश्वनाथ बोजा शेट्टी (वय ५६, रा. वनराज हॉटेल, भोसरी), विशाल विजय काळे (वय २१), सिद्धार्थ विजय काळे (वय २३, दोघेही रा. शंकरनगर, चिंचवड), सुनील मारूती गायकवाड (वय ५२, रा. चावडी चौक, आळंदी), सुरेश विश्वनाथ चंद्रवंशी (रा. मरकळ रोड, आळंदी) आणि दोन महिला आरोपी, अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस कर्मचारी वैभव विठ्ठल एरंडे यांनी बुधवारी (दि. २२) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसांत संगनमत करून बनावट कागदपत्र तयार केली. आरोपी शेट्टी, विशाल काळे, सिद्धार्थ काळे आणि महिला आरोपी यांना बोगस जामीनदार असल्याचे माहिती होते. तर उर्वरित आरोपींनी आपसांत संगनमत करून दिशाभूल करून शासनाची फसवणूक केली