पिंपरी : कोऱ्या ट्रान्सफर शेअर्स स्लिपवर सह्या घेवून दहा लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी शेअर्स ब्रोकींग कंपनीसह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी प्रबोध अर्थवर्धिनी शेअर्स ब्रोकींग कंपनी, तसेच या कंपनीचे मालक मोहन गुजराथी, संचालक रामचंद्र सदाशिव डिंबळे, दर्शन अशोक गुजराथी, दिपक गोसावी, प्रबोध अर्थ संचय वर्धनी (सिस्टर कन्सर्न) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अंजली अविनाश कुलकर्णी (वय ६२, रा. सेक्टर क्र. २७, रा. प्राधिकरण, निगडी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अंजली कुलकर्णी व त्यांचे पती यांचा विश्वास संपादन करुन दिपक गोसावी यांनी अंजली कुलकर्णी यांच्या कोरया ट्रान्सफर शेअर्स स्लिपवर सह्या घेतल्या. तसेच वेगवेगळया कंपन्यांचे शेअर्स अंजली कुलकर्णी यांच्या एचडीएफसी बँक डिमॅट अकाउंटवरुन प्रबोध अर्थवर्धिनी शेअर्स ब्रोकींग कंपनीने व या कंपनीचे मालक मोहन चिमनलाल गुजराथी, दर्शन अशोक गुजराथी, दिपक गोसावी व कंपनीचे संचालक रामचंद्र डिंबळे व प्रबोध अर्थसंचय वर्धनी यांनी दहा लाख रुपये किंमतीचे शेअर्स कुलकर्णी दाम्पत्याला न सांगता परस्पर प्रबोध अर्थवर्धिनी शेअर्स ब्रोकींग कंपनीचे खातेदार असलेले आरोपी दर्शन गुजराथी यांच्या खात्यात ट्रान्सफर केले. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपरीत दहा लाखांच्या फसवणूकप्रकरणी गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2018 4:45 PM