पिंपरी : नवरात्र काळात गरबा आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमास बंदी असताना गृहसंस्थेत दांडिया भरवणे आयोजकांना महागात पडले. आळंदी येथील जलाराम हाऊसिंग सोसायटीच्या तिघा पदाधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
गृह संस्थेचे प्रभारी सचिव आणि सांस्कृतिक कार्यक्रम पदाधिकारी प्रफुल्ल दत्तात्रय माळवदे, अध्यक्ष प्रताप वैजू शेवाळकर, उपाध्यक्ष महादेव पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
नवरात्र काळात गरबा, दांडिया आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम भरवण्यास मनाई आहे. तसेच पोलीस आयुक्तांनी जमाव बंदी लागू केलेली आहे. असे असताना आळंदी येथील जलाराम गृह संस्थेत २० ऑक्टोबरला रात्री नऊ ते दहा या वेळेत पंधरा ते वीस महिला आणि पुरुष दांडिया खेळत असल्याचे आढळून आले. पोलीस कर्मचारी मच्छिंद्र नागनाथ शेंडे यांनी फिर्याद दिली आहे.