पिंपरी-चिंचवड (वाकड) : मुंबई बंगळूर महामार्गालगत ताथवडे येथून चोरीला गेलेले महापालिकेच्या शौचालयाची ट्रॉली अखेर गुजर नगर थेरगाव येथे बुधवारी (दि १६) दुपारी आढळून आली. ही ट्रॉली हिंजवडी पोलिसांनी जप्त केली आहे. स्वच्छ सर्वेक्षणातंर्गत महापालिकेने ताथवडे चौकातील सेवा रस्त्यावर हे शौचालय ठेवले होते. मात्र, गेल्या आठवड्यात ते अचानक गायब झाल्याचे सफाई कामगारांच्या लक्षात आल्याने सर्वांनी शोध घेत अखेर हिंजवडी ठाण्यात फिर्याद दिली होती. दरम्यान, बुधवारी थेरगाव येथील गुजर नगर येथे हे शौचालय ऊभे आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार खातरजमा करून शौचालयाची ट्रॉलीताब्यात घेतली आहे. मात्र, हे शौचालय नागरिक वापरत असल्याचे पोलिसांचे म्हणणे असून कोणीतरी जाणून बुजून खोडसाळपणा केला असावा असा संशय पोलिसांना आहे. माहिती विहीर चोरीला गेल्याचे किस्से अनेकांच्या बोलण्यातुन ऐकायला मिळतात. मात्र, स्मार्ट सिटी असलेल्या पिंपरी चिंचवड शहरातून चक्क शौचालय चोरीला गेल्याची घटना चर्चेचा विषय बनली होती.
.....अखेर ताथवडेतून चोरीला गेलेले शौचालय सापडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 17:43 IST
गेल्या आठवड्यात ताथवडे येथून महापालिकेचे शौचालय चोरीला गेले होते. त्या चोरीची पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
.....अखेर ताथवडेतून चोरीला गेलेले शौचालय सापडले
ठळक मुद्देपोलिसांनी जप्त केली ट्रॉली : कोणीतरी खोडसाळपणा केल्याचा पोलिसांचा संशय