पिंपरी : शहरातील एकूण पाच बीआरटी मार्गांवरील सेवा पूर्ण क्षमतेने चालविण्यासाठी पीएमपी प्रशासनाकडे बससेवेची मागणी केली होती. मात्र, महापालिकेच्या हद्दीतील दोन बीआरटी मार्गांवर ही बससेवा सुरू करण्यास असमर्थ असल्याचे पीएमपीने कळविले आहे. मार्गतयार असूनही काळेवाडी फाटाते देहू-आळंदी रस्ता व आळंदी-बोपखेल या मार्गावरील बससेवा लांबणीवर पडणार आहे. त्यामुळे मार्ग पूर्ण होऊनही बसची वाट पाहावी लागणार आहे.पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी आणि सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी पीएमपीच्या वतीने तीन मार्गांवर बससेवा उपलब्ध करून दिला आहे. सांगवी फाटा ते मुकाई चौक-किवळे, नाशिक फाटा ते वाकड आणि दापोडी ते निगडी, दापोडी ते निगडी या तीन मार्गांवर बससेवा सुरू आहे. दोन मार्गांचे बहुतांश काम पूर्ण झाले असून, महापौर राहुल जाधव यांनी दोनच दिवसांपूर्वी काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी रस्ता व बोपखेल-आळंदी या बीआरटीएस मार्गांची पाहणी केली आहे. तसेच हे मार्ग लवकर सुरू करावेत, अशा सूचना प्रशासनास केल्या आहेत.काळेवाडी फाटा ते देहू आळंदी रस्ता चिखली आळंदी ते बोपखेल हे बीआरटी मार्ग तयार असून दोनही मार्गावर बससेवा सुरु नाही. या मार्गावर पंधरामिनिटांच्या फरकाने किमान पंधरा बस आवश्यक असणार आहे. त्याचबरोबर आळंदी ते बोपखेल या मार्गावर भविष्यात ९६ तर काळेवाडी फाटा ते देहू आळंदी रस्ता या मार्गावरील दहा टक्के राखीव बस धरुन १७ बस तसेच विविध बीआरटी मार्गावर सुरू असलेल्या ९१० अशा एकूण ११०३ बसची आवश्यकता आहे. एकूण ९९० बसपैकी बीआरटीसाठी केवळ ४२५ बस उपलब्ध होत आहेत.बससंख्या कमीपीएमपीला बीआरटी मार्गावर ६६८ बसची आवश्यकता आहे. दैनंदिन सरासरी केवळ ४२५ बस बीआरटीसाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे पीएमपीकडे उपलब्ध बसपैकी महामंडळाच्या आणि भाडेतत्त्वावरील अशा एकूण ४३ टक्के बस उपलब्ध होत आहेत. उर्वरित ५७ टक्के बस या नॉनबीआरटी मार्गावर तांत्रिक अडचणीमुळे जात आहेत.
बीआरटी मार्गासाठी मिळेना पीएमपी बस, काळेवाडी-देहू-आळंदी मार्ग
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2018 1:37 AM