तळेगाव दाभाडे:तळेगाव स्टेशन येथील बँक ऑफ बडोदा एटीएम सेंटरला लागलेल्या आगीतएटीएम सेंटर जळून खाक झाले.आगीची झळ इमारतीतील दोन सदनिकांना बसली. ही दुर्घटना शनिवारी सकाळी ८.३० च्या सुमारास घडली. शॉर्टसर्किट झाल्याने ही आग लागल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी ही आग तातडीने विझवली. आगीत नक्की किती नुकसान झाले याची पोलीस अधिकारी माहिती घेत आहेत.तळेगाव - चाकण रस्त्यावरील फलकेवाडी येथील सारस प्लाझा या इमारतीमध्ये बँक ऑफ बडोदा या बँकेची शाखा आहे.बँकेच्या वरील मजल्यावर डॉ. मिलींद कांजाळकर आणि सतीश कठापूरकर यांच्या सदनिका आहेत. त्यांना या आगीची झळ बसली.सुरुवातीस स्थानिक नागरिकांनी सदनिकांमधील गॅस सिलेंडर अलग केले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.ज्येष्ठ नगरसेवक गणेश खांडगे, माजी नगरसेवक सुदर्शन खांडगे, सतीश ओसवाल यांनी घटनास्थळी धाव घेतली.वीज वितरण कंपनीचे नरेंद्र भुईंगळ ,सतीश तुसे यांनी तातडीने वीज पुरवठा खंडित केला.सहाय्यक पोलीस निरीक्षक दुगंर्नाथ साळी,निलेश बोकेफोडे,दिगंबर अतिग्रे,आकाश ओव्हाळ, उमेश पुजारी,बाबराजे मुंडे यांनी घटनास्थळी धाव घेतली.नगरपरिषदेच्या अग्निशमन दलातील ताहीर मोमीन,शेखर खोमणे, रोहित पवार, बाळू ठाकर, आकाश ओव्हळ यांनी आगीवर तातडीने नियंत्रण आणले.नुकसानीचा पंचनामा करण्याचे काम चालू होते.आग लागल्यानंतर आवाज येत असल्याचे बँकेचे सुरक्षारक्षक संतोष पवार आणि एटीएमचे सुरक्षा रक्षक दिगंबर कुल यांनी सांगितले .
तळेगाव दाभाडे येथे बँकेचे एटीएम आगीत जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2020 11:22 AM