पिंपरी : चिखली, कुदळवाडी येथील भंगाराच्या चार गोदामाना आग लागली. ही घटना सोमवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली. याघटनेत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले याबाबत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशामक दलाला माहिती मिळाल्यानंतर महापालिकेच्या पिंपरीच्या मुख्य अग्निशमन केंद्रासहसह प्राधिकरण, तळवडे या केंद्राच्या गाडया घटनास्थळी दाखल झाल्या . यासह एमआयडीसीतील खाजगी कंपन्यांच्या अग्निशमन दलाच्या गाड्याही घटनास्थळी दाखल झाल्या. तीन तासानंतर आग आटोक्यात आली. या घटनेत भंगाराच्या गोदामाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
चिखलीत भंगाराच्या गोदामांना आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2019 12:21 IST