पिंपरी : तळवडे येथे शॉर्ट सर्किटमुळे विद्युत रोहित्र बनविणाऱ्या कंपनीला शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास आग लागली. तर, आगीची दुसरी घटना रहाटणी येथे घडली. रहाटणीतील गणेश बँकेला पहाटे पाचच्या सुमारास आग लागली. या आगीत महत्वाची कागदपत्रे जळून खाक झाली. तळवडे येथे विद्युत रोहित्राचे उत्पादन करणारी कंपनी आहे. कंपनीत फॅब्रिकेशनचे काम सुरु होते. त्यावेळी शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली. ही घटना सकाळी नऊच्या सुमारास घडली. पिंपरी, संत तुकारामनगर येथील दोन बंब, भोसरी आणि प्राधिकरणातील एक बंब अशी यंत्रसामग्री घेऊन अग्निशामक दलाचे जवान त्याठिकाणी गेले. अर्ध्या तासात त्यांनी आग आटोक्यात आणली. दुसरी आगीची घटना रहाटणी येथे घडली. गणेश बँकेला शनिवारी पहाटे पाचच्या सुमारास आग लागली. या आगीत बँकेतील कागदपत्रे जळून खाक झाली आहेत. रहाटणी अग्निशामक उपकेंद्राचा एक बंब घटनास्थळी दाखल झाला. त्यांनी अवघ्या काही मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळविले. तोपर्यंत बँकेची चलन व इतर कागदपत्रे जळून खाक झाली.
पिंपरी चिंचवड परिसरातील रहाटणी, तळवडेत आग; कंपनीतील कागदपत्रे जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 13:32 IST
तळवडे येथे शॉर्ट सर्किटमुळे विद्युत रोहित्र बनविणाऱ्या कंपनीला शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास आग लागली. तर, आगीची दुसरी घटना रहाटणी येथे घडली.
पिंपरी चिंचवड परिसरातील रहाटणी, तळवडेत आग; कंपनीतील कागदपत्रे जळून खाक
ठळक मुद्देरहाटणीतील गणेश बँकेला पहाटे पाचच्या सुमारास आग, महत्वाची कागदपत्रे जळून खाकतळवडे येथे शॉर्ट सर्किट, कंपनीत सुरु होते फॅब्रिकेशनचे काम