शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
3
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
4
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
5
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
7
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
8
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
9
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

वाल्हेकरवाडीत भीषण आग, अग्निशामक दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 18:23 IST

आग लागलेल्या भंगार दुकानालगतच परिसराला विद्युत पुरवठा करणारे होते रोहित्र...

ठळक मुद्दे.सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी नाही

रावेत : वाल्हेकरवाडी येथील सायली कॉम्प्लेक्स लगत असणाऱ्या भंगाराच्या दुकानाला आग लागल्याची घटना मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास घडली.सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केले होते. या घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. एक तासात आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.यामध्ये भंगारचे दुकाने जळून खाक झाले आहे.

 सुदैवाने या आगीत कोणालाही दुखापत झाली नाही.कोरोना आजाराच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन झालेले आहे. वाल्हेकरवाडीत देखील  संपूर्ण लॉकडाऊन झालेले असतानाच आज (मंगळवार दि. १४)  दुपारी मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या सायली कॉम्प्लेक्स परिसरातील भंगाराच्या दुकानांमध्ये दुपारी अचानक आग लागल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये भंगारचे दुकाने जळून खाक झाले आहे.काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले.या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. आग वाढत असल्याने अग्निशामक दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न सुरू करून आग आटोक्यात आणली. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. महापालिकेची अग्निशमन दलाची गाडी वेळेवर पोहचल्याने आगीवर नियंत्रण मिळवणे सोपे गेले,  मिळालेल्या माहितीनुसार या ठिकाणी अली शेख यांचे भंगार दुकान व एका दवाखान्याचे  गोडाऊन असल्याचे समजते.

मोठा अनर्थ टळला....आग लागलेल्या भंगार दुकानालगतच परिसराला विद्युत पुरवठा करणारे रोहित्र आहे. आग लागलेली समजताच महावितरणाच्या कर्मचाऱ्यांनी लागलीच वीजपुरवठा खंडित केला त्याचबरोबर भंगाराच्या दुकानात असलेली दोन गॅस सिलेंडर तरुणांनी जीव धोक्यात घालून बाहेर काढल्यामुळे त मोठा अनर्थ टळला.सदरचे दुकान हे अनाधिकृत पणे येथे उभारण्यात आले आहे.मागील तीन महिन्यात या दुकानाला चारवेळा आग लागण्याची घटना घडली आहे.भरवस्तीतील भंगारचे दुकान हटवावे याकरिता स्थानिकांनी अनेकवेळा पोलिसांकडे तक्रार केली होती. परंतु या तक्रारीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.प्रशासनाने तक्रारीची दखल घेऊन सदरचे दुकान येथून हटवले असते तर ही घटना घडली नसती अशी कुजबुज परिसरात ऐकायला मिळत होती.

 

टॅग्स :ravetरावेतfireआगfire brigade puneपुणे अग्निशामक दल