शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
ISRO आणि SpaceX ची भागीदारी यशस्वी, इलॉन मस्क यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
4
पुतिन, झेलेन्स्कींनी मला भेटून तोडगा काढावा; तिसरे महायुद्ध टाळायलाच हवे -डोनाल्ड ट्रम्प
5
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
6
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
7
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
8
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
9
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
10
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
11
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
12
निवडणूक निकालानंतर बेकायदा होर्डिंग्ज लावल्यास कारवाई करा; हायकोर्टाचे राज्य सरकार, पोलीस प्रमुखांना निर्देश
13
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
14
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
15
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
16
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
17
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
18
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
19
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
20
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध

फटाके व्यावसायिक झाले निराधार , न्यायालयाच्या निर्णयाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 2:54 AM

दिवाळीचा उत्साह सगळीकडे ऊतू जाऊ लागला असताना शहरातील नव्याजुन्या फटाका व्यावसायिकांमध्ये मात्र नाराजीची भावना आहे. सर्वोच्च न्यायालयाने निवासी भागात फटाके विक्री करू नये, असा निर्णय घेतला.

पिंपरी : दिवाळीचा उत्साह सगळीकडे ऊतू जाऊ लागला असताना शहरातील नव्याजुन्या फटाका व्यावसायिकांमध्ये मात्र नाराजीची भावना आहे. सर्वोच्च न्यायालयाने निवासी भागात फटाके विक्री करू नये, असा निर्णय घेतला. त्या निर्णयाचा फटका त्यांना बसला असून त्यामुळे अनेकांना दर वर्षी फटाका विक्रीतून होणा-या नफ्यावर पाणी सोडावे लागले आहे. एकूण ३५० फटाके विक्रेत्यांनी महापालिकेकडे परवानगी मागितली होती, त्यातील अवघ्या १५० जणांना परवानगी मिळाली आहे.फटाके हा दिवाळीचा अविभाज्य घटक आहे, त्यातही लहान मुलांसाठी तर फटाके म्हणजे दिवाळीच. मात्र गेल्या काही वर्षात वाढत्या प्रदूषणामुळे फटाक्यांचे दुष्परिणाम दिसू लागले आहेत. त्यामुळे पर्यावरणप्रेमींनी फटाक्यांच्या विरोधात जागृती मोहीमच सुरू केली आहे. त्यातच काही जणांनी थेट न्यायालयातच याचिका दाखल केल्यामुळे हा सिझनल व्यवसायच आता धोक्यात आला आहे. एका याचिकेवर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने निवासी इमारतीमध्ये फटाके विक्री नाही असे आदेश दिले आहेत. महापालिका व अन्य सर्व सरकारी यंत्रणा यावर बोट ठेवत फटाके विक्रेत्यांना परवाननी नाकारली आहे.अनेक विक्रेते गेल्या अनेक वर्षांपासून हा व्यवसाय करीत आहेत. सणस मैदानात पूर्वी फटाक्यांची बाजारपेठ असायची. महापालिका त्यासाठी स्टॉल देत असे. ती जागा देणे बंद झाल्यापासून फटाके विक्रेत्यांना चांगली जागाच मिळालेली नाही. त्यातच गेल्या काही वर्षात उपनगरांचा विकास झपाट्याने झाला. त्यामुळे तिथेही व्यवसाय सुरू झाला. शहराच्या मध्यवस्तीतील फटाके मार्केट मोडले ते मोडलेच, पुन्हा काही ते उभे राहिलेले नाही. काही व्यावसायिक आपल्याच दुकानात माल ठेवून फटाके विक्री करीत असत, त्यांना परवानगी नाकारण्यात आली आहे. दिवाळीसाठी म्हणून पूर्वीच मागवलेला त्यांचा सर्व माल पडून आहे.काही व्यावसायिकांनी महापालिका पदाधिकाºयांना भेटून यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला, तो काही प्रमाणात यशस्वी झाला आहे. त्यानुसार निवासी इमारतीमधील स्वत:च्या दुकानामधून फटाके विक्री करणाºयांनी त्या इमारतीमधील वरच्या मजल्यावर असणाºया सर्वांना फटाके विक्री सुरू आहे तोपर्यंत दुसरीकडे राहायला नेणार असे प्रतिज्ञापत्रक लिहून द्यायचे आहे. असे करण्यास कोणीही तयार नाही.काही जणांनी एकत्र येत यावर मार्ग काढला आहे. खडकी येथे एका मैदानात काहींनी दुकाने थाटली आहेत. शहरात रस्त्याच्या कडेला, खाद्यपदार्थाच्या स्टॉलसमोरच्या जागेत काही दुकाने सुरू झाली आहेत. उपनगरांमध्येही याच पद्धतीने काही जणांनी एकत्र येऊन एखाद्या मैदानात मार्केट सुरू केले आहे. मैदानात दुकान असेल तर लगेचच परवानगी मिळत असल्याने अशी लहान लहान मार्केट आता ठिकठिकाणी सुरू झालेली दिसत आहेत, मात्र यातही धोका आहेच. जास्त दुकाने असली, की तिथे अग्निशमन दलाची गाडी किंवा आग विझवण्यासाठीची काही तरी साधने असणे गरजेचे आहे. ती असल्याशिवाय अशा मार्केटला परवानगी देऊ नये असा नियम आहे, मात्र तो बाजूला ठेवून अशी मार्केट सुरू झाली आहेत.वर्षभर सुरू असलेल्या दुकानांचे काय?फटाक्यांची काही दुकाने बाराही महिने सुरू असतात. त्यातील बहुतेक दुकाने निवासी इमारतींमध्ये आहेत. तरीही ती सुरू आहेत, याकडे महापालिका अधिका-यांचे लक्ष वेधल्यानंतर त्यांनी त्यांची परवानगी जुनी असल्याचे सांगितले.या दुकानांमधून मोठमोठे फटाके विकले जातात, त्यांना परवानगी व साधे फटाके व तेसुद्धा फक्त दिवाळीपर्यंतच विकणाºयांना मात्र मनाई ही विसंगती असल्याची टीका फटाके विक्रेत्यांकडून करण्यात येत आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड