शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय वादांचे बॉम्ब, निवडणुकीच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोपांचे फटाके, नवनवीन मुद्दे आणि वादग्रस्त वक्तव्यांची मालिका
2
आजचे राशीभविष्य, ८ नोव्हेंबर २०२४ : प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल, खर्चाचे प्रमाण वाढेल
3
कांदा ८०, लसूण ५०० रुपये किलो! निवडणुकीच्या तोंडावर दरवाढ, सर्वपक्षीय उमेदवारांना टेन्शन
4
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
5
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
6
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
7
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
8
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
9
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
10
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
11
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
12
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
13
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
14
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
15
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
17
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
18
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
19
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

गोळीबार प्रकरणाचा उलगडा; आरोपीकडून पिस्तूल, काडतुसे जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 4:09 AM

चिंचवड येथील गोळीबाराच्या घटनेचा उलगडा झाला असून, पोलीस तपासात आरोपी हाती लागले आहेत. गोळीची जखम असताना, घडलेल्या गोळीबाराच्या घटनेची फिर्याद दाखल करण्यास जखमी टाळाटाळ करीत होता.

पिंपरी : चिंचवड येथील गोळीबाराच्या घटनेचा उलगडा झाला असून, पोलीस तपासात आरोपी हाती लागले आहेत. गोळीची जखम असताना, घडलेल्या गोळीबाराच्या घटनेची फिर्याद दाखल करण्यास जखमी टाळाटाळ करीत होता. मात्र पोलिसांनी स्वत:हून फिर्याद दाखल केली. जखमी इसमावर उपचार करणाऱ्या डॉक्टरने जखम पिस्तुलाच्या गोळीची असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी तपास करून तिघांना अटक केली. एक पिस्तूल व चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली, अशी माहिती परिमंडल तीनचे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी दिली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ मार्चला वाल्हेकरवाडी, चिंचवड येथे रात्री गोळीबार झाला. या घटनेतील आरोपी दौला नदाफ (वय २७, पिंपळे गुरव), अजमत शेख (वय २८, रा. वेताळनगर), सद्दाम शौकत अली नदाफ (वय २७, रा. बिजलीनगर), शिवाजी तानाजी सोनलकर (वय २१, मोरयानगर) यांना अटक करण्यात आली आहे. जखमी कोळपे याला पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसांसह ताब्यात घेतले.या गोळीबारात जयवंत चितळकर जखमी झाला. चितळकर याच्याबरोबर असलेला नीलेश कोळपेही जखमी झाला. याप्रकरणी चिंचवडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे व सहकारी माहिती घेण्यासाठी गेले. जखमी चितळकर विसंगत माहिती देऊ लागला. तसेच फिर्याद देण्यासही नकार देऊ लागला. पोलीस कर्मचारी सुरेखा सगर यांनी याप्रकरणी सरकारतर्फे फिर्याद दाखल केली. मकरंद वाल्हेकर आणि नीलेश कोळपे यांच्याबरोबर मद्य पिऊन जात असताना, तोल जाऊन पडल्याने लोखंडी सळई लागून जखम झाल्याचा बनाव चितळकर याने केला होता.मात्र, घटनेच्या तपासासाठी खोलात जाण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला. चितळकर याच्यावर उपचार करणारे डॉक्टर अमोल पाटील यांनी, जखम पिस्तुलाच्या गोळीची असल्याचा अहवाल त्यांनी दिला.सीसीटीव्ही कॅमेºयाच्या फुटेजचा आधारघटनास्थळाजवळील सीसीटीव्ही कॅमेºयाचे फुटेज तपासले असता, चार ते पाच जणांमध्ये मारहाण झाल्याचे दिसून आले. मात्र चेहरे अस्पष्ट दिसत होते. फेसबुकच्या माध्यमातून छायाचित्रे जुळवून पाहिली. ती छायाचित्रे जखमीला दाखवली, तरीही त्यांना ओळखत नसल्याचे जखमीने सांगितले. पिंपळे गुरव भागात शोध घेऊन एका संशयितास ताब्यात घेतले. दौला जबार नदाफ याच्याकडे चौकशी केली असता, त्याने सांगितले की, दारू पिऊन चितळकर व त्याच्या साथीदारांनी आपले मामा अजमत शेख यांना अडवून शिवीगाळ व मारहाण केली.याबाबत मामाने मला कळविले. त्या वेळी वेताळनगर परिसरातच असल्याने तीन मित्रांना घेऊन शिवाजी चौकाजवळ गेलो आणि मामाला का मारले याचा जाब विचारला. त्या वेळी एकाने पिस्तूल उगारले. सद्दाम नदाफ याने ते हिसकावले, मात्र त्या वेळी चुकून गोळी सुटून ती चितळकरच्या दंडाला चाटून गेली. पिस्तूल खाली पडले. पिस्तूल घेऊन तेथून ते पसार झाले.

टॅग्स :Crimeगुन्हा