पिंपरी : आपले वर्चस्व रहावे म्हणून दहशत निर्माण केली. त्यासाठी हवेत गोळीबार केला. याप्रकरणी सांगवी पोलिसांनी सापळा रचून दोन जणांना अटक केली. जुनी सांगवी येथे सोमवारी (दि. १७) रात्री साडेदहाच्या सुमारास ही कारवाई केली.
सुजल राजेंद्र गिल (वय १८, रा. विनायक नगर, नवी सांगवी), रिहान आरिफ शेख (वय १९, रा. पिंपळे गुरव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी रविवारी (दि. १६) साडेअकराच्या सुमारास जुनी सांगवी परिसरात हवेत गोळीबार केला. जुनी सांगवी परिसरात लोकांना दमदाटी करू दहशत निर्माण केली. तसेच परिसरात आपले वर्चस्व रहावे यासाठी आरोपींनी गोळीबार केला, अशी माहिती सोमवारी (दि. १७) पोलिसांना मिळाली. त्यानुसार, सांगवी पोलिसांनी जुनी सांगवी येथील विसर्जन घाटाजवळ सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून २५ हजार रुपयांचे एक देशी बनावटीचे पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली.