ठळक मुद्देवेगवेगळ्या कंपनीच्या 71 हजार 210 रुपयांच्या दारुच्या 31 बाटल्या तसेच रोख रक्कम
पिंपरी : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी वाईनशॉपमधून वेगवेगळ्या कंपनीच्या दारुच्या 31 बाटल्या चोरट्याने चोरून नेल्या. विशालनगर, काळेवाडी येथे बुधवारी (दि. 1) रात्री पावणेअकरा ते गुरुवारी (दि. 2) सकाळी दहाच्या दरम्यान घरफोडीचा हा प्रकार घडला.सिध्देश हरीश लालवाणी (वय 30, रा. पिंपळे सौदागर) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फियार्दी लालवाणी यांचे विशालनगर, काळेवाडी येथे वाईन शॉप आहे. बुधवारी रात्री हे वाईन शॉप बंद असताना अज्ञात चोरट्याने शटर उचकटून शॉपमध्ये प्रवेश केला. वेगवेगळ्या कंपनीच्या 71 हजार 210 रुपयांच्या दारुच्या 31 बाटल्या तसेच रोख रक्कम, एक डीव्हीआर व हार्ड डिस्क चोरून नेली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.