शहरं
Join us  
Trending Stories
1
गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी शिवसेनेत, जेलमधून परतताच पक्षप्रवेश
2
Maharashtra Election 2024: नितीन गडकरींच्या घरी फडणवीस-बावनकुळेंचे 2 तास खलबते
3
Navya Haridas: प्रियंका गांधींविरोधात भाजपाचा उमेदवार ठरला! नव्या हरिदास कोण?
4
राजेंद्र शिंगणेंच्या हाती तुतारी; पुतणीने शरद पवारांना विचारला खरमरीत सवाल!
5
‘वंचित’कडून विधानसभेसाठी आणखी १६ उमेदवारांची घोषणा; साताऱ्यातील २ जागांचा समावेश!
6
अखेर रणजीतसिंह मोहिते पाटलांचं ठरलं! आमदारकीचा राजीनामा; लवकरच पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
7
ठाकरेंना कोणत्या जागा हव्यात, ज्यामुळे महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा गाडा फसलाय?
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मोहोळ, पंढरपूर अन् माढ्याचं गणित चुकल्यास पवारांचं राजकारण बिघडणार
9
Jharkhand Election 2024: भाजपाची पहिली यादी आली! झारखंडमधील ६६ उमेदवारांच्या नावाची घोषणा
10
वडील बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर झिशान सिद्दिकींची संतप्त पोस्ट; शायरीतून रोख कुणाकडे?
11
भाजप नेतृत्वाच्या मनात नेमकं काय?; फडणवीस-अजितदादा बाहेर, अमित शाह-CM शिंदेंची बंद दाराआड चर्चा!
12
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला की नाही? फडणवीसांनी दिली महत्वाची माहिती
13
माढ्यात पवारांना धक्का बसणार? काँग्रेसच्या इच्छुक उमेदवाराने मराठा समाजाकडेच मागितली उमेदवारी
14
JMM-काँग्रेसमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोण किती जागांवर निवडणूक लढवणार? जाणून घ्या...
15
'वादळवाट', 'आभाळमाया' मालिकांचे गीतकार मंगेश कुलकर्णी यांचं निधन
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "...तर महाराष्ट्रात पडसाद उमटतील", बाबासाहेब देशमुखांनी ठाकरेंची चिंता वाढवली!
17
महागड्या प्लॅनचे टेन्शन संपले, Jio चा 84 दिवसांचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन
18
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'सांगोला'मध्ये ठाकरेंविरोधात पुन्हा 'सांगली पॅटर्न'?
19
Ladki Bahin Yojana: मोठी बातमी! लाडक्या बहिणी दिवाळी बोनसपासून मुकणार? निवडणूक आयोगाने योजना रोखली
20
IND vs NZ : भारताने ५४ धावांत ७ गडी गमावले; सुवर्णसंधी हुकली, विजयासाठी न्यूझीलंडसमोर खूप सोपे आव्हान

पहिला दिवस अर्जाविना

By admin | Published: February 02, 2017 3:51 AM

वडगाव मावळ पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी बुधवारी एकही अर्ज दाखल झाला नाही.

वडगाव मावळ : वडगाव मावळ पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी बुधवारी एकही अर्ज दाखल झाला नाही. तहसील कार्यालयाकडे इच्छुक उमेदवार फिरकलेच नसल्याने सर्वत्र शुकशुकाट दिसून आला. तहसील कार्यालयाच्या आवारात इच्छुक उमेदवारांची कागदपत्रांविषयी माहिती घेण्यासाठी व जुळवाजुळव करण्यासाठी तुरळक गर्दी झाली होती. पंचायत समितीची निवडणूक येत्या २१ फेबुवारीला होत असून, उमेदवारी भरण्याचा बुधवारी पहिला दिवस होता. तालुक्यात सर्वच पक्षांनी निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्यामुळे उमेदवारी अर्जदेखील पुढील दोन-तीन दिवसांत मोठ्या प्रमाणात भरले जाण्याची शक्यता आहे. सध्या कोणत्याच पक्षाने आपले उमेदवार जाहीर न केल्यामुळे तिकीटवाटप न झाल्यामुळे कोणीही अर्ज भरला नाही. उमेदवारी अर्जासोबत अनामत रक्कम भरल्याची पावती अथवा चलन, संगणकीकृत नामनिर्देशन पत्रातील सर्व रकाने भरलेली स्वाक्षरी केलेली मूळप्रत, साक्षांकित केलेले प्रतिज्ञापत्रे, घोषणापत्रे , मालमतेविषयी प्रतिज्ञापत्र, २१ वर्षपूर्ण झाल्याचा पुरावा, मतदार यादीतील नोंदीची प्रमाणित प्रत, राखीव जागेसाठी सक्षम अधिकाऱ्याची जातीच्या प्रमाणपत्राची प्रमाणित प्रत, जात पडताळणी प्रमाणपत्र, अथवा पडताळणीसाठी सादर प्रस्तावाची पोच व राजकीय पक्षाकडून निवडणूक लढवत असल्यास जोडपत्र १ व २ आदी कागदपत्रे जोडणे उमेदवाराला आवश्यक आहे. तहसील कार्यालयाला बुधवारी निवडणूक निरीक्षक धनवडे यांनी भेट दिली. निवडणूक अधिकारी मावळचे प्रांत सुभाष बागडे व तहसीलदार जोगेंद्र कट्यारे उपस्थित होते (वार्ताहर) राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या सर्व उमेदवारांचा आपल्या मतदारसंघाचे व्हीजन काय असेल, असा एक मिनिट व्हिडीओ तयार करून संकेतस्थळावर टाकण्यात येणार होता. परंतु प्रत्येक महापालिका, जिल्हा परिषदांमध्ये उमेदवारांची संख्या हजारांच्या घरात जात असून, यासाठी येणारा खर्च कोण करणार, याबाबत निवडणूक आयोगाकडून कोणत्याही स्पष्ट सूचना नाहीत. यामुळे येत्या दोन दिवसांत निवडणूक आयोगाकडून स्पष्ट मार्गदर्शन मागविण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सांगितले.असा आहे निवडणुकीचा कार्यक्रमउमेदवारी अर्ज दाखल करणे : १ ते ६ फेबु्रवारी सकाळी ११उमेदवारी अर्जांची छाननी : ७ फेबु्रवारीउमेदवारी अर्ज मागे घेणे अंतिम तारीख : १३ फेबु्रवारीमतदान : २१ फेबु्रवारी सकाळी ७.३० ते ५.३० मतमोजणी : २३ फेबु्रवारी सकाळी १० वाजल्यापासूनसोशल मीडियावर खास वॉचजिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत उमेदवार अथवा समर्थकांकडून प्रचारासाठी मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचा वापर होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाकडून फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप व अन्य सर्व सोशल मीडियावर खास वॉच ठेवण्यात येणार आहे.