बोपखेल : येथे सकाळी ऐन कामाच्या गडबडीत बसचा टायर पंक्चर झाल्याने येथील नागरिकांची मोठी धावपळ झाली. बोपखेल येथून पुण्याकडे, तसेच खडकीकडे जाणारा मोठा नोकरवर्ग, शाळकरी मुले आहेत. हे विद्यार्थी आणि नागरिक सकाळी साडेआठच्या बसने बोपखेल येथून खडकी, पुण्याकडे जातात. बुधवारीही सकाळी साडेआठला बोपखेल येथून ही बस निघाली असता रस्त्यात बंद पडली. त्यामुळे ‘पीएमपी’कडून दुसरी बस पाठविण्यात आली. तीही पंक्चर झाल्याने प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.
पीएमपीची बोपखेल-सांगवी ही बस बोपखेलकरांसाठी लाइफलाइन बनली आहे. मात्र या भागात नादुरुस्त आणि जुन्या बस पाठविल्या जातात. त्यामुळे भर रस्त्यात त्या बंद पडतात. सातत्याने त्यांच्यात बिघाड होतो. परिणामी येथील प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. पैसे देऊनही त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र असे असतानाही पीएमपी प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. नियोजनाचा अभाव आणि ढिसाळ कारभाराचा फटका बोपखेल येथील प्रवाशांना बसत आहे. बुधवारी सकाळी साडेआठला नेहमीप्रमाणे बोपखेल-सांगवी बस बोपखेल येथून निघाली. ही बस जुनाट असल्याने भर रस्त्यात बंद पडली. त्यात नेमका काय बिघाड झाला आहे, याबाबत वाहक आणि चालकांनाही अंदाज आला नाही. त्यामुळे दुसरी बस पाठवा, अशी विनंती प्रवासी, वाहक आणि चालकाकडून संबंधित आगाराच्या अधिकाºयांकडे करण्यात आली. त्यानंतर येथे दुसरी बस आली. त्यामुळे प्रवाशांसह वाहक आणि चालकानेही सुटकेचा नि:श्वास टाकला. दुसºया बसमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची एकच गडबड झाली. मात्र, या बसचा टायर पंक्चर असल्याचे लक्षात आले. त्यामुळे पुन्हा प्रवाशांची निराशा झाली. काहीसा दिलासा मिळाल्याची भावना असतानाच सर्वांकडून संताप व्यक्त करण्यात आला. पीएमपीच्या ढिसाळ कारभाराबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली.
बोपखेलकरांसाठी बसची सुरळीत सेवा अपेक्षीत आहे. जेणेकरून येथील प्रवाशांचे हाल होणार नाहीत. याबाबत सातत्याने मागणी होत आहे. मात्र, पीएमपी प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. परिणामी बोपखेलमधील प्रवाशांची परवड सुरू आहे. पीएमपीने बोपखेल- सांगवी या मार्गावर निदान सुस्थितीतील बस उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी बोपखेल येथील प्रवाशांकडून करण्यात येत आहे.नादुरुस्त, जुनाट बसमुळे समस्या४बोपखेलचा रहदारीचा रस्ता सीएमईने बंद केला आहे. त्यामुळे येथील नागरिकांना बसने विश्रांतवाडीमार्गे खडकी भागात यावे लागते. खडकीतूनच बोपोडी, पुणे, सांगवी, औंध, पिंपरी-चिंचवड आदी भागात जाता येते. त्यामुळे या मार्गावरील बससेवा बोपखेलकरांसाठी ‘लाइफलाइन’ आहे. मात्र पीएमपी प्रशासनाकडून या मार्गावर नादुरुस्त आणि जुनाट बस सोडण्यात येत आहेत. त्यामुळे या बसमध्ये सातत्याने बिघाड होऊन भर रस्त्यात त्या बंद पडतात. त्यामुळे येथील प्रवाशांचे हाल होत आहेत.दुसºया बसचा टायर पंक्चर असल्याने पर्यायी व्यवस्था करण्याचा तगादा प्रवाशांकडून करण्यात येत होता. याबाबत वाहक आणि चालकाने संबंधित आगारातील अधिकाºयांना माहिती दिली. पर्यायी व्यवस्था करण्यात यावी, असेही सुचविले. मात्र पर्यायी बस न पाठविता पंक्चर टायर बदलण्याची सूचना करण्यात आली.टायर बदलण्यासाठीचे साहित्य आदी उपलब्ध नसल्याने टायर बदलता येणार नाही, असे संबंधित वाहक आणि चालकांकडून संबंधित अधिकाºयांना सांगण्यात आले. पंक्चर टायर बदलण्यासाठीचे साहित्य आणि कर्मचारी आगारातून पाठविण्यात यावे, अशी विनंतीही संबंधित वाहक आणि चालकांनी केली. मात्र आगारात कमी कर्मचारी आहेत. त्यामुळे कर्मचारी पाठविण्यात येणार नाहीत, असे संबंधित अधिकाºयांनी सांगितले.पीएमपीच्या या ढिसाळ कारभाराचा बोपखेल येथील प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अन्य प्रवासी भर रस्त्यात ताटकळले असताना पर्यायी व्यवस्था करण्यात आली नाही. त्यामुळे प्रवाशांना कामावर वेळेत पोहोचता आले नाही. विद्यार्थ्यांनाही शाळेत वेळेत जाता आले नाही. काही प्रवाशांना रुग्णालयात जायचे होते. त्यांचीही कुचंबणा झाली. मात्र पीएमपी प्रशासनाला याबाबत काहीही देणेघेणे नसल्याचे गुरुवारच्या प्रकारावरून दिसून आले.