रहाटणी : सध्या प्रचार अंतिम टप्प्यात आल्याने उमेदवार प्रचार रॅलीवर भर देत आहेत. मात्र रॅलीसाठी कार्यकर्ते आणणार कोठून हा प्रश्न अनेक उमेदवारांच्या समोर डोकेदुखी ठरत आहे. त्यासाठी भाडोत्री कार्यकर्त्यांच्या शोधात उमेदवार फिरत आहेत, तर काहींनी ही एजन्सीच सुरु केली आहे. एखादा उमेदवार माणसे पाहिजेत असे म्हणताच बोला किती देणार, काय साहेब परिवार दोन-दोन तासासाठी अमुक घेतले. तुमचा तर चार तास प्रचार करायचा आहे. काम काही असो, मात्र दाम किती देणार हे आधी बोला नंतर किचकिच नको. मला काय? तुम्ही आपल्या जवळचे म्हणून कमी सांगितले.पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीने वेग पकडला असतानाच राजकीय पक्षाच्या व अपक्षांच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ निघणाऱ्या रॅलीला कार्यकर्ते मिळेनासे झाले आहेत. परिणामी, प्रचार रॅलीत गर्दी वाढावी, म्हणून भाडोत्री कार्यकर्त्यांवर जोर दिला जात आहे. एका भाडोत्री कार्यकर्त्यांसाठी उमेदवारांना ४०० रुपयांपासून ८०० रुपये मोजावे लागत आहेत. परिणामी महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराची स्थिती ‘दाम बोला काम बोला’ अशी झाली आहे. मात्र काही असले, तरी भाडोत्री कार्यकर्त्यांची चंगळ होत असून, भाडोत्री कार्यकर्ते पुरवठा करणारे एजंट मालामाल झाले आहेत. (वार्ताहर)
पहिले दाम बोला, नंतर काम!
By admin | Published: February 17, 2017 4:46 AM