शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
3
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
4
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
5
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
6
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
7
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
8
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
9
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
10
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
11
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
12
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
13
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
14
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
15
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

बांधकामाच्या बाजारमूल्यावर करआकारणी, महापालिका स्थापनेनंतर पहिल्यांदाच फेररचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 6:09 AM

महापालिका स्थापनेनंतर पहिल्यांदाच मिळकत दरात (रेटेबल व्हॅल्यू) फेररचना करण्याचा निर्णय आयुक्त श्रावण हर्र्डीकर यांनी घेतला आहे. राज्य सरकारच्या नोंदणी व मुद्रांक विभागाचे वार्षिक मूल्य दर (रेडिरेकनर) व पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने निश्चित केलेले भूखंडांचे दर आधारभूत घेऊन कर निर्धारण करण्याचे प्रस्तावित आहे.

पिंपरी : महापालिका स्थापनेनंतर पहिल्यांदाच मिळकत दरात (रेटेबल व्हॅल्यू) फेररचना करण्याचा निर्णय आयुक्त श्रावण हर्र्डीकर यांनी घेतला आहे. राज्य सरकारच्या नोंदणी व मुद्रांक विभागाचे वार्षिक मूल्य दर (रेडिरेकनर) व पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने निश्चित केलेले भूखंडांचे दर आधारभूत घेऊन कर निर्धारण करण्याचे प्रस्तावित आहे. बांधकामाचा दर्जा व वापरानुसार कर आकारणी करण्यात येणार आहे.महापौर, पक्षनेते व अधिकाºयांची बैठक सोमवारी झाली. या वेळी बाजारमूल्यावर आधारित मिळकत कर आकारणीच्या नवी पद्धतीची माहिती आयुक्त हर्डीकर यांनी दिली. महापौर नितीन काळजे, सभागृहनेते एकनाथ पवार, उपमहापौर शैलजा मोरे, मनसे गटनेते सचिन चिखले, अपक्षांचे गटनेते कैलास बारणे उपस्थित होते. सहआयुक्त दिलीप गावडे यांनी प्रस्तावित कर योग्यमूल्य निर्धारण दराचे विवेचन केले. त्याविषयी सहआयुक्त गावडे म्हणाले, मिळकतीचा वापर व बांधकाम दर्जा लक्षात घेऊन महापालिका हद्दीत १९९० पासून कर योग्यमूल्य निर्धारण करण्यात आले आहे. त्यासाठी बांधकाम दर्जा, मिळकत वापराचा प्रकार व बिल्ट अप क्षेत्रफळ विचारात घेण्यात आले. २००१-०२ पर्यंत महापालिका क्षेत्रात एकाच दराने कर योग्यमूल्य निश्चित करण्यात येत होते. त्या वेळी महापालिका कार्यक्षेत्रातील काही भाग अविकसित होता. त्यामुळे काही करदात्यांवर अन्याय होत. नव्याने समाविष्ट झालेल्या १८ गावांमध्येही नागरी सुविधा पूर्णपणे उपलब्ध नव्हत्या. या परिस्थितीचा विचार करून २००२-०३ मध्ये महापालिका क्षेत्राची अ, ब आणि क विभागात वाटणी झाली. तर, २००९मध्ये ताथवडे गावाचा पालिकेत समावेश झाल्यावर ‘ड’ विभाग करण्यात आला. सध्या या ‘झोनिंग’नुसार कर योग्यमूल्य निश्चित करण्यात आले आहे.शहराचा विस्तार व मूलभूत सुविधांचा वापर वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर मिळकत कररचना निर्धारण पद्धतीत बदल करणे आवश्यक आहे. नव्या पद्धतीनुसार, वार्षिक मूल्यदर व पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने निश्चित केलेले मोकळ्या भूखंडांचे दर आधारभूत मानण्यात येणार आहेत. त्यावर कर निर्धारण करण्याचे प्रस्तावित आहे. १६ करसंकलन विभागीय कार्यालयांमध्ये गावांची विभागणी केली जाणार आहे. महापालिका कर योग्य मूल्य निर्धारणाचे सध्याचे प्रती चौरस फुटाचे दर विचारात घेऊन मुद्रांक शुल्क विभागाकडील गावानुसार सरासरी काढण्यात येणार आहे.अशी आहे फेररचना...निवासी आरसीसी बांधकामाच्या प्रतिचौरस फूट दराच्या ०.००८ टक्के कर योग्यमूल्य आकारले जाईल. साधे बांधकाम असल्यास आरसीसी बांधकामाच्या ७५ टक्के, पत्राशेडसाठी आरसीसी बांधकामाच्या ६६ टक्के दराने करआकारणी केली जाईल. बिगरनिवासी बांधकामांना निवासी दराच्या तिप्पट, औद्योगिक बांधकामांना दीडपट, निवासी पार्किंगसाठी २५, बिगरनिवासी पार्किंगसाठी ५०, व्यावसायिक मोकळ्या जागेला ३०, खेळाच्या मैदानासाठी २० टक्के दराने आकारणी प्रस्तावित आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड