शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
2
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
3
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
4
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
5
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
6
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
7
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
8
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
9
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
10
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
11
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
12
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
13
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
14
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
15
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
16
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
17
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
18
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
19
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
20
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय

एमआयडीसीतील पाच हजार बांधकामे नियमित होणार

By admin | Published: May 28, 2017 3:55 AM

पिंपरी-चिंचवड औद्योगिक क्षेत्रातील जी ब्लॉकमधील (शाहूनगर) रहिवाशी इमारतींना बांधकाम पूर्णत्वाचा दाखला देण्याचा निर्णय उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नुकताच घेतला

- लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : पिंपरी-चिंचवड औद्योगिक क्षेत्रातील जी ब्लॉकमधील (शाहूनगर) रहिवाशी इमारतींना बांधकाम पूर्णत्वाचा दाखला देण्याचा निर्णय उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नुकताच घेतला. एमआयडीसी संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. याचा फायदा पिंपरी-चिंचवड शहरातील सुमारे पाच हजारांहून अधिक मिळकतधारकांना होणार आहे, अशी माहिती आमदार अ‍ॅड. गौतम चाबुकस्वार यांनी दिली. पिंपरी-चिंचवड औद्योगिक नगरीतील कामगारांच्या सोयीसाठी जी ब्लॉकमधील एमआयडीसीच्या निवासी भूखंडावर सोसायटी स्थापन करून रहिवाशी प्रकल्प आकारास आला. सदर इमारतींमध्ये राहण्यासाठी आलेल्या कामागारांनी अल्प जागेमुळे इमारतीतील बाल्कनी भिंत तोडून ही जागा खोलीमध्ये समाविष्ट केली. यामुळे कायदेशीदृष्ट्या सदनिकेच्या बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळत नव्हता. त्यामुळे सदनिकेच्या विक्री तसेच हस्तांतरण या बाबींना अडथळा निर्माण झाला होता. याबाबत चाबुकस्वार म्हणाले,‘‘उद्योगमंत्री देसाई यांनी अधिकाऱ्यांसह पिंपरी-चिंचवड एमआयडीसी परिसराला भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर या प्रश्नावर महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.’’पत्रकार परिषदेस शिवसेनेचे शहरप्रमुख, गटनेते राहुल कलाटे, अमित गावडे, नगरसेविका मीनल यादव, माजी नगरसेविका सुलभा उबाळे, प्रकाश बाबर, अनंत कोऱ्हाळे, शिवसेना विभागप्रमुख विशाल यादव, पांडुरंग पाटील आदी उपस्थित होते.मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी विभागीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) उभारण्याचा निर्णय सामाजिक न्याय विभागाने घेतला आहे. त्यानुसार पिंपरी-चिंचवडसह मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर येथे निवासी औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरू करण्यात येणार आहे. शहरामध्ये नोकरी करणाऱ्या महिलांसाठी वसतिगृह उभारण्यात येणार आहे. हे वसतिगृह सामाजिक न्याय विभागाच्या वतीने बांधले जाईल, असे चाबुकस्वार सांगितले.