शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

परदेशी झाडांच्या मोहापायी चैत्रपालवीचा विसर

By admin | Published: April 28, 2017 5:43 AM

आपल्या वातावरणाचा अविभाज्य भाग असणाऱ्या देशी झाडांवर सध्या चैत्रपालवीचा सोहळा साजरा होत आहे. या दिवसांमध्ये देशी झाडांना नविन पालवी

रविकिरण सासवडे / बारामतीआपल्या वातावरणाचा अविभाज्य भाग असणाऱ्या देशी झाडांवर सध्या चैत्रपालवीचा सोहळा साजरा होत आहे. या दिवसांमध्ये देशी झाडांना नविन पालवी, मोहोर येतो. सहाजिकच रणरणत्या उन्हात सुद्धा देशी झाडे हिरवीगार अणि भरगच्च दिसतात. मात्र मागील काही वर्षांपासून परदेशी दिखाऊ झाडांच्या मोहापायी देशी झाडांकडे दुर्लक्ष होऊ लागले. त्याचे परिणाम येथील वातारणावर होऊ लागले आहेत. परदेशी झाडांच्या मोहापायी चैत्रपालवीचा विसर पडू नये असे म्हनण्याची वेळ आली, त्यामुळे पुन्हा देशी झाडांच्या संवर्धनाची व संगोपनाची गरज निर्माण झाली आहे. पर्यावरण प्रेमींनी पाठपुरावा केल्यामुळे आता देशी झाडांचे संगोपन आणि संवर्धन करण्याची मोहीम बारामती मध्ये सुरू केली आहे.देशी झाडांमुळे तापमान देखील कमी होते. उन्हाळ््याच्या सुरूवातीला फेब्रुवारी-मार्च महिन्यापासून ते अगदी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत देशी झाडे जिर्ण पाने सोडून नवपालवी धारण करतात. वड , पिंपळ, चिंच, फणस, आवळा, आंबा ,बेल, कडुनिंब, मोह, कदंब, पळस आदी देशी झाडे हिरवीगार होतात. भर उन्हाळ््यात या झाडांच्या बहरण्यामुळे त्या त्या परिसरात गारवा निर्माण होतो. तसेच पावसाळ््याच्या पार्श्वभूमीवर देशी झाडे फळ तयार करतात. उन्हाळ््यात पाण्याअभावी पशू-पक्षांच्या आहाराची देखील व्यवस्था देशी झाडांमुळेच होते. प्राण्यांमुळे फळांच्या बिया जागोजागी विखुरल्या जातात. पावसाळ््यात या बिया रूजतात. नविन झाडे जन्म घेतात. आपल्या परिसरातील हे निसर्गचक्र अव्याहतपणे सुरू आहे. मात्र मागील काही वर्षांपासून शहरी आणि ग्रामीण भागात देखील हे चित्र बदलत आहे. कॅशिया, ग्लिरिसिडीया, फायकस, सप्तपर्णी, स्पॅथोडिया, रेन ट्री या परदेशी दिखाऊ झाडांच्या मोहाला बळी पडून अनेक शाळा, तसेच सार्वजनिक ठिकाणी तसेच नवविभागात देखील परदेशी झाडांच्या लागवडी झाल्या. भर उन्हात सावली देण्याऐवजी या परदेशी झाडांची पानझड होऊन ही झाडे अगदी निष्पर्ण होतात. शस्त्रीय दृष्ट्यादेखील अपल्या वातावरणाशी परदेशी झाडे योग्या नसल्याचे अनेक पर्यावरण प्रेमींनी वेळोवेळी सप्रमाण दाखवून दिले आहे. मात्र तरिही अज्ञाना अभावी अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये परदेशी झाडांचेच वृक्षारोपन घेतले जाते. काही पर्यावरण प्रेमींमुळे आता सजगता येऊ लागली आहे. त्यामुळे ठराविक रोपवाटिकांमधून देशी झाडांची देखील रोपे मिळू लागील आहेत. वड, पिंपळ, आंबा, चिंच यांसारख्या मोठ्या देशी झाडांमुळे आद्रतेचे प्रमाण वाढले जाते. साहजिकच या पावसाळ््यात येणाऱ्या मान्सुन वाऱ्यापासून पाऊस पाडण्यासाठी आपल्या देशी झाडांनी तयार केलेली आद्रता महत्त्वाची भूमिका बजावते. मात्र परदेशी झाडांचा सोस, देशी झाडांची होणारी मोठ्या प्रमाणावर कत्तल, वनविभागांमधून झालेली परदेशी झाडांच्या लागवडी यामुळे येथील जमिनीचे तापमानदेखील वाढू लागले. साहजिकच देशी झाडांच्या कमतरतेमुळे आद्रतादेखील कमी होऊ लागली. त्याचा परिणाम येथील कमी होणाऱ्या पाऊसकाळावर तसेच वाढणाऱ्या तापमानामुळे दिसून येऊ लागले आहे. वनविभागामध्ये देशी झाडांचे व्यवस्थित वृक्षारोपण होऊन त्याची योग्य राखली गेल्यास आपली मरणासन्न असणारी वने हिरवीगार होण्यास मदत होईल. तसेच देशी झाडांच्या फळांमुळे भर उन्हाळ््यातही चिंकारा, ससे, विविध शाकाहारी पशू-पक्षी यांच्या आहाराचा प्रश्न सुटण्यास काहीप्रमाणात मदत होणार आहे. तसेच चाराटंचाईच्या काळात मानवीवस्तीकडे होणारे वन्यजीवांचे स्थलांतर कमी होईल. येथील कऱ्हानदी काठच्या परिसरात देशी झाडे लावून त्यांचे संगोपन करण्याची मोहीम सिद्धार्थ एज्युकेशन सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांंनी सुरू केली आहे. नदीकाठावर पिंपळ, वड, आंबा, जांभूळ, चिंच, कडूलिंब आदी झाडांचे रोपन केले. येत्या काही वर्षात नदीकाठ हिरवागार दिसणार आहे, असे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.